Last Updated on 19 Jan 2025 5:49 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या ४१ पुण्यतिथीनिमित्त कासेगाव एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील आरोग्य केंद्राच्या (ओपीडी) वतीने सोमवार दि.२० पासून चार दिवसांचे महा आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले आहे. या महा शिबिरात इस्लामपूर शहरासह परिसरातील १९ गावातील गरजू रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी,उपचार व औषधोपचार केला जाणार आहे. कापुसखेड नाका येथील इन्स्टिट्यूट ऑफ नरसिंग एज्युकेशन येथे सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत ही शिबिरे होणार आहेत.
सोमवार दि.२० जानेवारी रोजी इस्लामपूर शहरातील प्रभाग क्रमांक १,२,३ व ४ तसेच बहे, हुबालवाडी,खरातवाडी,नरसिंह पूर,शिरटे या गावातील रुग्णांची तपासणी व उपचार केले जाणार आहेत.
मंगळवार दि. २१ रोजी प्रभाग क्रं.५,६ व ७ तसेच कि.म.गड,लवंडमाची,बेरडमाची,कोळे व येडेमच्छिंद्र,तर बुधवार दि.२२ रोजी ८,९ व १० तसेच रेठरेहरणाक्ष,भवानीनगर बिचुद, दुधारी आणि गुरुवार दि.२३ रोजी ११,१२ १३ व १४ तसेच बोरगाव,फारणेवाडी,साटपेवाडी गौंडवाडी व साखराळे येथील रुग्णांची तपासणी केली जाणार आहे.
या शिबिरात ह्रदयरोग,कँसर,नाक-कान- घसा,नेत्ररोग,आस्था,मेडिसीन,सर्जरी,मोफत डोळ्यांचे नंबर तपासणी केली जाणार आहे. मोफत रक्त,लघवी,रक्तातील साखर तपासणी करून जरुरीप्रमाणे ईसीजी घेतला जाणार आहे. ५० दिवसांच्या जंत गोळ्या दिल्या जाणार आहेत. पुढील सर्वरोग तपासणी व उपचार व शस्त्रक्रिया शासकीय योजने अंतर्गत किंवा सवलतीच्या दरात कराड येथील कृष्णा हॉस्पिटल येथे केले जाणार आहेत. अधिक माहिती साठी मो.क्रं.७७२०९००९२२ संपर्क करावा,असे आवाहन संयोजकांनी केलेले आहे.











































































