Last Updated on 31 Jan 2024 2:29 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । लोकनेते राजारामबापू पाटील स्मृती आरोग्य शिबिरांची सांगता चिकूर्डे (ता. वाळवा) येथे करण्यात आली. वाळवा व मिरज तालुक्यातील 15 आरोग्य शिबीरांचा 15 हजार 364 रुग्णांनी लाभ घेतला आहे.या शिबिरातील 7 हजार रुग्णांना मोफत चष्मे वाटप केले जात असून 1 हजार 500 नेत्र रुग्णांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. स्व.बापूंच्या अकाली निधना नंतर साहेबांनी सुरू केलेला हा रुग्ण सेवेचा यज्ञ अखंड तेवत ठेवू. भविष्यात या आरोग्य शिबिरांची व्याप्ती वाढविणार असल्याची भावना राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी व्यक्त केली.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना व सांगली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने स्व.बापूंच्या स्मरणार्थ वाळवा व मिरज तालुक्यातील 15 प्राथमिक आरोग्य केंद्रात हा उपक्रम राबविला आहे. या शिबीरांचा 105 गावातील रुग्णांनी लाभ घेतला आहे.चिकूर्डे येथील सांगताप्रसंगी शशिकांत पाटील,संजय पाटील,संग्राम जाधव,देवराज देशमुख,शिवाजीराव साळुंखे,दिलीप खांब,चांदसो तांबोळी,रावसाहेब भोसले,रणजित पाटील,शैलेश पाटील, अमरसिंह साळुंखे,धनश्री माने,सुप्रिया भोसले,डॉ.संदीप कोडग तसेच चिकूर्डे व परिसरातील गावातील सरपंच,पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

या शिबिरात रक्त,लघवी,रक्तदाब,शुगर, तसेच सर्वरोग तपासणी करून उपचार केले आहेत. गरजेप्रमाणे ईसीजीही काढला आहे. या शिबिरातील रुग्णांवर पुढील शस्त्रक्रियाही केल्या जाणार आहेत. या शिबिरातून अनेक ग्रामस्थांना आपणास उच्च रक्तदाब आणि मधुमेह असल्याचे प्रथमच समजले आहे.
कृष्णा हॉस्पिटल कराड,सिनर्जी मिरज, सेवासदन मिरज,आदित्य सांगली,सुदर्शन सांगली,जयंत नेत्रालय इस्लामपूर,तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी रुग्ण सेवा दिली. डॉ.प्रकाश म्हाळुंगकर,युवक राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष देवराज देशमुख,इलियास पिरजादे,विनायक मुगळे, संदीप माळी यांच्यासह कार्यकर्त्यांनी या शिबिरांचे संयोजन केले.











































































