Last Updated on 03 Jan 2025 8:22 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । लाडकी बहिण योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. ‘लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी अर्जांची छाननी होणार आहे. ज्या लाभार्थीबाबत तक्रारी आल्या आहेत. त्या लाभार्थी महिलांचे अर्ज तपासून बाद केले जाणार आहेत.’, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे निकष बदललेले नाहीत…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत शासनाने काढलेल्या निर्णयात कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. या योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यात जमा करण्यात आला होता. आतापर्यंत या योजनेचे सहा हप्ते महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. म्हणजेच आतापर्यंत महिलांच्या खात्यात प्रत्येकी नऊ हजार रुपये जमा झाले आहेत. डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम या महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे.
सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे निकष बदललेले नाहीत, तर जे निकष आहेत त्यांच्या अधीन राहूनच छाननी केली जाईल, अशी माहिती महिला आणि बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी आज दिली आहे. ज्या अर्जांबद्दल तक्रारी आल्या आहेत. त्यांची छाननी केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. इतरही सर्व तक्रारींची दखल घेऊन त्यांचीही छाननी केली जाईल, असं त्या म्हणाल्या.
हेही वाचा 👉 ‘त्या’ शेतकऱ्यांना सरकार देणार जमिनी; राज्य मंत्रिमंडळाचा बैठकीत निर्णय
हे आहेत निकष…
👉 दोन हेक्टरपेक्षा (पाच एकर) अधिक शेतजमीन नसावी
👉 लाभार्थी लाडक्या बहिणीच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन नको
👉 लाभार्थी महिला केंद्र व राज्य सरकारच्या दुसऱ्या वैयक्तिक योजनेची लाभार्थी नसावी
👉 योजनेसाठी एका कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केलेला नसावा
👉 कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांहून अधिक नसावे
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 24 Aug 2026 8:44 PM by Sanjay Patil/Adhorekhit आतापर्यंत १२,५८,२४३ शेतकऱ्यांना ₹१०,११५ कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती या योजनेच्या दुसऱ्... Read more












































































