Last Updated on 14 Sep 2024 9:06 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान निवासस्थानी जन्मलेल्या वासराचे नामकरण ‘दीपज्योती’ असे केले
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय निवासस्थानी एका गायीने वासराला जन्म दिला आहे. त्या वासराच्या कपाळावर प्रकाशाचे प्रतीक असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वासराचे नाव ‘दीपज्योती’ ठेवले आहे, अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी स्वत: आपल्या एक्स मीडिया प्लॅटफॉर्म फोटो आणि व्हिडीओ शेअर करत दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान निवासस्थानी जन्मलेल्या वासराचे नामकरण ‘दीपज्योती’ असे केले आहे. याबाबत फोटो आणि व्हीडिओ एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करताना पंतप्रधानांनी लिहिले –
“आपल्या शास्त्रात म्हटले आहे – ‘गाव: सर्वसुख प्रदा:’
लोककल्याण मार्ग येथील पंतप्रधान निवास कुटुंबात एका नव्या सदस्याचे शुभ आगमन झाले आहे.
पंतप्रधान निवासस्थानी प्रिय गोमातेने एका वासराला जन्म दिला असून, त्याच्या कपाळावर ज्योतीची खूण आहे.
म्हणून मी त्याचे नाव ‘दीपज्योती’ ठेवले आहे.”
7, लोककल्याण मार्ग येथील एक नवा सदस्य,
दीपज्योती खूपच मोहक आहे.”













































































