Last Updated on 08 Sep 2023 11:42 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । राज्यातील रोजगार हमी योजनेत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन गेल्या तीन महिन्यापासून रखडले असून सदरचे मानधन तात्काळ न मिळाल्यास येत्या 12 सप्टेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा ‘रोहयो’ च्या सहायक कार्यक्रम अधिकारी संघटनेने दिला आहे.
राज्यातील रोजगार हमी योजनेत कार्यरत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी,तांत्रिक सहाय्यक लिपिक कम डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना नुकतीच महिन्याला प्रत्येकी 8 हजारांची मानधन वाढ करण्यात आली आहे.’रोहयो’ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी 6 महिन्यापूर्वी राज्यभर सुरु केलेले काम बंद आंदोलन केले होते.पण,या कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यापासून मासिक मानधन मिळालेले नाही.हे कंत्राटी कर्मचारी मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत.
रोजगार हमी योजनेत कार्यरत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी,तांत्रिक सहाय्यक लिपिक कम डाटा एन्ट्री ऑपरेटर यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सहाय्यक कार्यक्रम अधिकारी,तांत्रिक सहाय्यक लिपिक कम डाटा एन्ट्री ऑपरेटर संघटनेने 6 महिन्यापूर्वी (मार्च मध्ये) राज्यभर सुरु केलेले काम बंद आंदोलन केले होते.मानधन वाढीचा प्रस्ताव मंजूर करण्याबाबत शासनाकडून आश्वासित केल्यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते.त्यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांना महिन्याला प्रत्येकी 8 हजार रुपये मानधन वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला.राज्यातील सुमारे 3 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना याचा लाभ झाला.सदरची मानधन वाढ दिनांक 01 जुलै 2022 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू झाली.
एकाबाजूला ‘रोहयो’ च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 8 हजार रुपये मानधनवाढ झाली.पण,दुसऱ्या बाजूला मात्र या कर्मचाऱ्यांचे मानधन गेल्या तीन महिन्यापासून रखडले आहे.सणासुदीच्या काळातच मानधन रखडले आहे.जुन व जुलै,ऑगष्ट 3 महीने पुर्ण झालेली आहेत आणि 4 था महिना चे 6 दिवस पुर्ण झालेले आहे.अजुनही मानधन जमा झालेले नाही.वेळेत मानधन होत नसल्यामुळे कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.संघटनव्दारे वेळेत मानधन करण्यात यावे म्हणुन वारंवार निवेदन व पाठपुरावा करण्यात येत आहे तरी सुध्दा आजअखेर मानधन खात्यात जमा झालेले नाही.
येत्या 8 दिवसात प्रलंबित 3 महीन्याचे मानधन नविन पध्दातीनुसार एकत्रीत एका वेळेस अदा करावे.मानधन न झाल्यामुळे नाईलाजास्तव येत्या 12 सप्टेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा सहायक कार्यक्रम अधिकारी संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे.सदर संप कालावधीत मनरेगा अंतर्गत कोणतेही कामात अडचणी निर्माण झाल्यास त्यास कर्मचारी जबाबदार नाहीत असेही रोहयोच्या प्रधान सचिवांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.









































































