Last Updated on 06 Oct 2024 11:22 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सहाय्यक कार्यक्रम अधिकारी संघटनेचे राज्य सचिव अमोल पवार यांची माहिती
सांगली । राज्यातील ‘रोहयो’ च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत बुधवारी संघटनेच्या शिस्टमंडळाने मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. याबाबत मुख्यमंत्र्यांनी आठवड्यात बैठक घेण्याचे निर्देश रोजगार हमी विभागाला दिल्याची माहिती सहाय्यक कार्यक्रम अधिकारी संघटनेचे राज्य सचिव अमोल पवार यांनी दिली. मागण्यांबाबत ६ ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
१४ मार्च २०२३ रोजीचा शासन निर्णय मधील परिशिष्ट- अ तात्काळ अमलात आणावे मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा तयार करुन कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांचे आकृतीबंधामध्ये समायोजन करण्यात यावे तसेच सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना अंशकालीन कर्मचारी म्हणून घोषित करावे आदी मागण्या ‘रोहयो’ अंतर्गत कार्यरत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, क्लार्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आहेत.
हेही वाचा – कामेरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास कायाकल्प पुरस्कार
या मागण्यांबाबत आज मुंबईत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी संघटनेचे राज्य सचिव अमोल पवार, सचिन खबाले, कृष्णा गोसावी, मेहमुद पटेल, असिफ शेख, मच्छिद्र पाटील, सागर योगेश गायकवाड, चंद्रकांत शिंगटे या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिल्याचे अमोल पवार यांनी सांगितले. तसेच याबाबत मुख्यमंत्र्यांनी आठवड्यात बैठक घेण्याचे निर्देश रोजगार हमी विभागाला दिले.
अमोल पवार म्हणाले, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत मागील १३ ते १५ वर्षापासुन प्रामाणिकपणे अखंडीत मग्रारोहयोची कामे करीत आहोत. पण आम्हाला कोणतीच नोकरी बद्दल शाश्वती नाही. वेळोवेळी वरीष्ठांनी दिलेली कामे व जबाबदारी आम्ही व्यवस्थीत पार पाडत असुन मग्रारोहयोची कामे वेळेवर पुर्ण करीत आहोत. त्याचप्रमाणे कोविड-१९ अशा महामारीच्या काळातसुध्दा आम्ही नियमीत कार्यरत राहुन स्वतःच्या जीवाची पर्वा न करता व आम्हाला कोणत्याही शासकिय सुविधा नसतांना सुध्दा मग्रारोहयो अंतर्गत योजनांचे गावामधील प्रत्येक मजुरांना फार मोठ्याप्रमाणात कामे उपलब्ध करून देऊन रोजगार दिलेला आहे.कंत्राटी कर्मचारी तुटपुंज्या मानधनामध्ये काम करीत आहेत.यामध्ये आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे शक्य नाही. शासनाने ठरवल्याप्रमाणे आम्ही गाव समृद्ध व कुटुंब समृद्ध करण्यासाठी काम करीत आहे.
हेही वाचा – राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
राज्य नियामक मंडळाच्या बैठकीतील इतिवृत्तानुसार राज्यातील अत्यल्प मानधनावर कार्यरत ‘रोहयो’ कर्मचाऱ्यांना सन २०१९ नंतर अनुभव वाढीच्या टप्प्यानुसार तातडीने मानधनवाढ लागु करावी,सामन काम वेतन लागू करावे, मागील १४ वर्षापासून आजअखेर योजनेत कार्यरत असणा-या कंत्राटी कर्मचा-यांना शासन सेवेत सामावून घेऊन,योजना असेपर्यंत किंवा नियत वयोमानापर्यंत कार्यरत ठेवण्याचे सेवा हमी संरक्षण देण्याचा लोकप्रिय निर्णय घेण्यासाठी रोहयो विभागास निर्देश द्यावेत आदी संघटनेच्या मागण्या असल्याचे कार्यक्रम अधिकारी संघटनेचे राज्य सचिव अमोल पवार सांगितले.
हेही वाचा – नाफेड मार्फत मुग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु












































































