नाफेड कार्यालयाने १९ जिल्ह्यांतील १४६ खरेंदी केंद्राना मंजुरी
NCCF कार्यालयाने ७ जिल्ह्यांतील ६३ खरेदी केंद्रांना मंजुरी
शेतकरी नोंदणी दि. १ ऑक्टोंबर पासून सुरु
सोयाबीन हमीभाव दर ४८९२ रुपये प्रतिक्विंटल
छत्रपती संभाजीनगर । महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई व नाफेड व NCCF कार्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हंगाम २०२४-२५ मध्ये राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेड NCCF मार्फत मुग, उडीद व सोयाबीन खरेदीकरीता शेतकरी नोंदणी दि. १ ऑक्टोंबर पासून सुरु करण्यात आली असून प्रत्यक्षात मुग, उडीद खरेदी दि.१० ऑक्टोंबर आणि सोयाबीन खरेदी दि.१५ ऑक्टोंबर पासून सुरु करण्यात येणार आहे.
राज्य शासनाने नियुक्त केलेल्या दोन्ही केंद्रीय नोडल एजन्सीना खरेदीकरीता जिल्ह्यांची विभागणी करुन दिलेली आहे. केंद्रीय नोडल एजन्सीचे नाव नाफेड विभागुन दिलेले जिल्हे व मंजुर खरेदी केंद्र संख्या याप्रमाणे-
अकोला -९, अमरावती – ८, बीड – १६, धाराशिव – १५, धुळे – ५, जळगांव – १४, जालना – ११, कोल्हापुर – १, लातुर – १४, नागपुर – ८, नंदुरबार – २, परभणी – ८, पुणे – १, सांगली – २, सातारा – १, वर्धा – ८, वाशिम – ५, यवतमाळ – ७.
NCCF मार्फत सुरु करण्यात येणारे खरेदी केंद्र संख्या जिल्हानिहाय याप्रमाणे- नाशिक -६, अहमदनगर – ७, सोलापूर – ११, छत्रपती संभाजीनगर – ११, हिंगोली – ९, चंद्रपुर – ५, व नांदेड – १४.
केंद्रीय नोडल एजन्सी NCCF ने विभागुन दिलेले तालुके व मंजुर खरेदी केंद्र संख्या छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, पाचोड येथे असून मुग हमीभाव ८६६२ रुपये प्रति क्विंटल असून नोंदणी कालावधी दि.१ ऑक्टोंबरपासून सुरु असून खरेदी कालावधी दि.१० ऑक्टोंबर ते ७ जानेवारी २०२५ पर्यंत आहे. उडीद हमीभाव ७४०० रुपये प्रति क्विंटल असून नोंदणी कालावधी दि.१ ऑक्टोंबर पासुन सुरु असून खरेदी कालावधी दि.१० ऑक्टोबर ते ७ जानेवारी २०२५ पर्यंत आहे. सोयाबीन हमीभाव दर ४८९२ रुपये प्रतिक्विंटल असून नोंदणी कालावधी दि.१५ ऑक्टोबर ते दि.१२ जानेवारी २०२५ पर्यंत आहे.
नाफेड कार्यालयाने १९ जिल्ह्यांतील १४६ खरेंदी केंद्राना मंजुरी दिली आहे. तसेच NCCF कार्यालयाने ७ जिल्ह्यांतील ६३ खरेदी केंद्रांना मंजुरी दिलेली आहे. त्यांच्या मार्फत शासनाने निश्चित केलेल्या कालावधीत मुग, उडिछ व सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे. सर्व शेतकरी बांधवांनी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मुग, उडिद व सोयाबीन खरेदी योजनेचा लाभ घ्यावा.
ही योजना शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा याकरीता राबविण्यात येत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी मुग, उडिद व सोयाबीन विक्रीकरीता आपल्या गावाजवळील नाफेड / NCCF च्या नजिकच्या खरेदी केंद्रावर जाऊन ७/१२ उतारा, आधारकार्ड व बँकेचे पासबुक घेऊन प्रथम आपल्या पिकाची नोंदणी करुन घ्यावी व आपणास SMS प्राप्त झाल्यांतर शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेऊन यावा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे, उपाध्यक्ष रोहीत दिलीप निकम, सर्व संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक श्रीधर डुबे पाटील व सरव्यवस्थापक देविदास भोकरे यांनी केले आहे.