Last Updated on 23 Dec 2024 7:47 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । रोजगार हमी योजनेच्या सहाय्यक कार्यक्रम अधिकारी संघटनेच्या पश्चिम विभागीय अध्यक्षपदी अमोल अरुण पवार यांची एकमताने निवड झाली.
सहाय्यक कार्यक्रम अधिकारी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची पुणे येथे नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत इस्लामपूर येथील पंचायत समितीच्या रोजगार हमी विभागाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अमोल पवार यांची पुणे विभागीय अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
राज्य अध्यक्ष रोहन पवार, सचिव बाळासाहेब गायकवाड व राज्यातील सर्व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.
या निवडीनिमित्त त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या निवडीबद्दल त्यांचा पंचायत समितीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 24 Jul 2026 8:41 PM by Sanjay Patil/Adhorekhit मुंबई । राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६’ अंतर्गत १६ लाख ९६ ह... Read more













































































