Last Updated on 26 Aug 2024 12:54 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । ‘रॅगिंग हा निंदनीय व अमानुष प्रकार आहे. रॅगिंग करणे अमानवी आहे. त्यासाठी कडक कायदे आहेत.एखाद्याचा छळ करणे म्हणजे नैतिक मूल्यांचा ऱ्हास असतो. त्यामुळे रॅगिंगच्या गुन्ह्यापासून विद्यार्थ्यांनी सावध राहिले पाहिजे.’ असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांनी केले.
इस्लामपूर येथील मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयाच्या अँटी रॅगिंग विभागामार्फत आयोजित अँटी रॅगिंग सप्ताहामध्ये ते ‘रॅगिंग चे दुष्परिणाम व तारुण्यभान या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ.अंकुश बेलवटकर हे होते.
ते पुढे म्हणाले, विद्यार्थिनींनी रॅगिंग, हॅकिंग व ट्रॅपिंगला बळी पडू नये. सोशल मीडियाचा जपून वापर करावा. सायबर गुन्ह्यापासून स्वतःचे रक्षण करावे. आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे. हव्यासापोटी चुकीच्या लोकांशी मैत्री करू नये. कोणी आपले रॅगिंग करत असेल तर शिक्षकांना कळवा. पोलीस तुमचे रक्षण करतील. मोबाईल फोनचा जपून वापर करा. त्याचे दुष्परिणाम ओळखा.
अध्यक्ष डॉ.बेलवटकर म्हणाले, शाळा महाविद्यालयामध्ये रॅगिंगचे प्रकार होऊ नयेत यासाठी महाविद्यालय दक्ष असते. विद्यार्थिनींनी आपल्या करिअरवर लक्ष द्यावे. अन्यायाचे निराकरण व सुरक्षिततेसाठी महाविद्यालय कटिबद्ध आहे.
स्वागत, प्रास्ताविक व संयोजन प्रा. वर्षा पाटील (उपासे) यांनी केले. प्रा. मेघमाला पाटील यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी नॅक कोऑर्डिनेटर प्रो. स्नेहल हेगिष्टे, शिक्षक स्टाफ व विद्यार्थिनी उपस्थित होता. श्री.अभिजीत पाटील व अमर जंगम हे पोलीस अधिकारी उपस्थित होते. डॉ. राम घुले यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.









































































