Last Updated on 18 Jun 2023 9:26 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर । आयआयटीमधील प्रवेशासाठी घेतल्या जाणार्या राष्ट्रीय पातळीवरील ‘जेईई (अॅडव्हान्स)’ २०२३ या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच वेबसाईटवर जाहीर झाला. या निकालावरून आयआयटी, एनआयटी, ट्रीपल-आयटी सोबतच पेट्रोलियम अॅण्ड एनर्जी, स्पेस सायन्स अॅण्ड टेव्नâॉलॉजी, पेट्रोलियम टेव्नâॉलॉजी यासारख्या विविध पदवीसाठी प्रवेश दिले जातात.

चाटे शिक्षण समुहाच्या ज्युनिअर कॉलेज, क्लासेस, आयआयटी-नीट सेंटरच्या कोल्हापूर विभागातील विद्यार्थ्यांनी निकालाची उज्ज्वल यशाची परंपरा जेईई (अॅडव्हान्स) या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेतही कायम राखली आहे. या प्रवेश परीक्षेत समुहाच्या एकूण ११ विद्यार्थ्यांनी यश मिळवून आपला आयआयटी व राष्ट्रीय पातळीवरील इतर संस्थांमधील प्रवेश पक्का केला आहे. या परीक्षांसाठी राबविण्यात आलेल्या चाटे पॅटर्नचा विद्यार्थ्यांना फायदा झाल्याचे गुणवंत विद्यार्थ्यांनी सांगितले. भविष्यातही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी चाटे शिक्षण समुहाचे विद्यार्थी कटीबद्ध राहतील अशी ग्वाही चाटे समुहाचे संचालक प्रा. डॉ. भारत खराटे यांनी दिली.
जेईई-(अॅडव्हान्स) २०२३ च्या परीक्षेत यशस्वी होऊन आयआयटी व राष्ट्रीय पातळीवरील इतर संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी यशस्वी झालेले चाटे शिक्षण समुहाचे विशेष गुणवंत विद्यार्थी – महेश येवले, आशिष पाटील, संकेत शिंदे, अथर्व साळोखे, रोहन मोरबाळे, अनिकेत कांबळे, माही कल्याणकर, सिद्धी देसाई, आरती आंबेकर, अनुज कोरे, विशाखा प्रज्ञासागर.
या सर्व यशस्वीतांना चाटे शिक्षण समुहाचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र चाटे व प्रा. गोपीचंद चाटे, संचालक, कॉलेजचे प्राचार्य व सर्व प्राध्यापक, शाखा व्यवस्थापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी गुणवंतांचे त्यांच्या उज्ज्वल यशाबद्दल अभिनंदन केले व त्यांना पुढील उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या़.









































































