Last Updated on 26 Oct 2024 6:55 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी आज जाहीर केली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत एकूण २२ उमेदवार जाहीर करण्यात आले.
जयंत पाटील यांनी शनिवारी मुंबईमध्ये २२ नावांची घोषणा केली आहे. पूर्वीचे ४५ आणि आजचे २२ अशी ६७ नावांची यादी जाहीर केली आहे.
गंगापूरमधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असलेले सतीश चव्हाण यांना तर अजित पवार यांच्या पक्षातून नुकतेच बाहेर पडलेले फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. परांडा विधानसभा मतदारसंघ राहुल मोटेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
अकोल्यामधून अमित भांगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर एरंडोलमधून सतिश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गंगापूरमधून सतिश चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पर्वतीमधून आश्विनी कदम, बीडमधून संदीप क्षीरसागर, माळशिरसमधून उत्तमराव जानकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघातून सचिन दोडके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी
१. एरंडोल – सतीश अण्णा पाटील
२. गंगापूर – सतीश चव्हाण
३. शहापूर – पांडुरंग बरोरा
४. परांडा – राहुल मोटे
५. बीड – संदीप क्षीरसागर
६. आर्वी – मयुरा काळे
७. बागलान – दीपिका चव्हाण
८. येवला – माणिकराव शिंदे
९. सिन्नर – उदय सांगळे
१०. दिंडोरी – सुनीता चारोस्कर
११. नाशिक पूर्व – गणेश गीते
१२. उल्हासनगर – ओमी कलानी
१३. जुन्नर – सत्यशील शेरकर
१४. पिंपरी – सुलक्षणा शीलवंत
१५. खडकवासला – सचिन दोडके
१६. पर्वती – अश्विनीताई कदम
१७. अकोले – अमित भांगरे
१८. अहिल्या नगर शहर -अभिषेक कळमकर
१९. माळशिरस – उत्तमराव जानकर
२०. फलटण – दीपक चव्हाण
२१. चंदगड – नंदिनीताई भाबुळकर कुपेकर
२२. इचलकरंजी – मदन कारंडे








































































