Last Updated on 13 Feb 2024 8:31 PM by Sanjay Patil/Adhorekhit
युवक शहराध्यक्षपदी दिग्विजय पाटील,तर युवती शहराध्यक्षपदी दीपाली साधू
सांगली । राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने इस्लामपूर महिला शहराध्यक्षपदी सौ.पुष्पलता विनायक खरात,युवक शहराध्यक्षपदी दिग्विजय आनंदराव पाटील,तर युवती शहराध्यक्षपदी दीपाली निलेश साधू यांची निवड करण्यात आली.
युवा नेते प्रतिक पाटील,युवकचे प्रदेश सरचिटणीस,पक्ष निरीक्षक अरुण हासबे (सोलापूर),तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,शहराध्यक्ष शहाजी पाटील,महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव,युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव,कार्याध्यक्ष देवराज देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांसह मावळत्या शहराध्यक्षा रोझा किणीकर,युवक शहराध्यक्ष सचिन कोळी,युवती शहराध्यक्षा प्रियांका साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी युवती तालुकाध्यक्ष पदी अँड. प्रियांका विलास पाटील (भडकंबे),युवकच्या इस्लामपूर शहर उपाध्यक्ष पदी अभिजित दिलीपराव कुर्लेकर,सरचिटणीस पदी अभिजित सुभाषराव रासकर,सोशल मीडिया शहराध्यक्ष पदी अभिमन्यू दादासो क्षीरसागर यांची निवड करण्यात आली.
प्रतिक पाटील म्हणाले,राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वा खालील आपल्या शहर व तालुक्यातील संघटना आदर्शवत मानली जाते.ही परंपरा कायम ठेवत आपण सर्वांनी वेळ देत,सर्वांना बरोबर घेऊन पक्ष संघटना अधिक मजबूत करावी. यावेळी पक्ष निरीक्षक अरुण हासबे यांनीही नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील,माजी नगरसेवक खंडेराव जाधव,विश्वनाथ डांगे,माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर,अँड.धैर्यशिल पाटील,प्रदेश सदस्या कमल पाटील,उषा पंडीत मोरे,स्वरूप मोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.












































































