Last Updated on 24 Jan 2022 4:27 PM by Sanjay Patil/Adhorekhit
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी ट्विटवरून दिली ही माहिती
पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन;म्हणाले “काळजी आणि शुभेच्छा…”
काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा-महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
आदरणीय पवार साहेब, आराम करा आणि काळजी घ्या-मंत्री जितेंद्र आव्हाड
मुंबई ।
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष,खासदार शरद पवार यांना करोनाची लागण झाली आहे.पवार यांनी ट्वीट करत याविषयीची माहिती दिली आहे.
शरद पवार यांनी स्वत: ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. मला करोनाची लागण झाली असली तर काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझ्यावर उपचार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी स्वत:ची करोना चाचणी करुन घ्यावी, अशी विनंतीही शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे.
गेले दोन दिवस शरद पवार पुणे आणि बारामतीमध्ये होते. मुंबईत आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली ती पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती आहे. शरद पवार यांनी कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत.
दरम्यान, साधारण महिन्याभरापूर्वी २९ डिसेंबर २०२१ रोजी शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी ट्विट करुन ही माहिती दिली होती. सुप्रिया सुळे यांच्यासह त्यांचे पती सदानंद सुळे यांनाही कोरोनाची लागण झाली होती.
शरद पवार यांनी कोरोनाची लागण झाल्याचे ट्वीट केल्यानंतर राजकीय क्षेत्रासह सर्वच क्षेत्रांमधून चांगल्या प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन;म्हणाले “काळजी आणि शुभेच्छा…”
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील फोन करुन शरद पवारांची चौकशी केली आहे. शरद पवारांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन करुन माझ्या प्रकृतीची चौकशी केली. त्यांनी दाखवलेली काळजी आणि शुभेच्छांसाठी मी आभारी आहे,” असं शरद पवार ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, शरद पवार यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करता. काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा.
राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आदरणीय पवार साहेबांची कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडो, या सदिच्छा..! आदरणीय पवार साहेब, आराम करा आणि काळजी घ्या.
८१ वर्षीय शरद पवार यांनी करोनाची पहिली लस १ मार्च २०२१ रोजी घेतली होती त्यानंतर ७ मार्च २०२१ रोजी त्यांनी करोना प्रातिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला होता.












































































