Last Updated on 09 Jul 2025 5:10 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदवीधर संघटनेच्या वाळवा तालुका अध्यक्ष पदी अभिजीत शिंदे (बोरगाव) यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांच्या हस्ते त्यांना निवड पत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अभिजित शिंदे यांनी पदाधिकारी व युवक सहकाऱ्यांच्यासह लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
आ.पाटील म्हणाले,आज पदवीधरांना सरकारी व खाजगी नोकरी तसेच रोजगार, व्यवसाय संदर्भात अनेक समस्या भेडसावत आहेत. त्या समस्या सोडवण्यासाठी पदवीधर संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करावा.
अभिजित शिंदे म्हणाले,आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पदवीधर संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील पदवी धरांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू.
याप्रसंगी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,नेर्ले गावचे सरपंच संजय पाटील, पदवीधर संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल सूर्यवंशी,जिल्हाध्यक्ष अजित जाधव,युवक तालुकाध्यक्ष संग्रामसिंह जाधव,कार्याध्यक्ष देवराज देशमुख,रणजीत शिंदे,धैर्यशील पाटील,रणजीत थोरात,घनश्याम पाटील, सचिन घबक,सचिन दळवी,आनंदा माळी, प्रदीप पाटील,सतीश बाबर,श्रीकांत पाटील, संग्राम पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.













































































