Last Updated on 12 Jun 2023 12:49 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कार्याध्यक्षपदी प्रा. मकरंद बडवे,उपाध्यक्षपदी विश्वास पाटील
सचिवपदी अधिक बडवे तर सहसचिव पदी शरद पवार यांची निवड 
सांगली । पश्चिम महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बहे येथील रामलिंग देवस्थानच्या विकासासाठी ग्रामसभेच्या मान्यतेने स्थापन करण्यात आलेल्या श्री रामलिंग बेट देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी सौ.विजयमाला संजय पाटील यांची निवड करण्यात आली.उपाध्यक्षपदी विश्वास गणपती पाटील यांची तर सचिवपदी अधिक वसंतराव बडवे यांची निवड करण्यात आली.

इतर कार्यकारिणी अशी : कार्याध्यक्ष-मकरंद रघुनाथ बडवे,सहसचिव – शरद यशवंत पवार,सदस्य – संभाजी उत्तमराव पाटील,प्रमोद महादेव सुतार,सुनील रघुनाथ पाटील,झाकिरहुसेन अजिज जमादार,अनिकेत उत्तम धुमाळ,दादासो शांतनु बाबर,विशाल जयसिंग कदम,गणपती जगन्नाथ शिंदे
ही समिती सरपंच संतोष दमामे,उपसरपंच हणमंत पाटील तसेच सर्व सदस्य,ग्रामस्थांच्या सूचनांनुसार काम करणार आहे.प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले बहे रामलिंग बेट हे निसर्गसुंदर स्थळ असून पश्चिम महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवस्थान परिसराला कृष्णेच्या पाण्यामुळे निसर्गाचं वरदान लाभलेले आहे.या परिसराचा विकास अधिक गतीने व्हावा यासाठी ग्रामपंचायतीने ग्रामसभेच्या मान्यतेने श्री रामलिंग बेट देवस्थान समितीची स्थापना केली आहे.
रामलिंग बेट परिसरात माजी मंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून पर्यटन विकासाची कामे झाली आहेत.लवकरच बिहार पॅटर्नच्या माध्यमातून पंचायत समितीच्या सहकार्यातून पहिल्या टप्प्यात १ हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.याठिकाणी दररोज मोठ्या संख्येने भाविक-पर्यटक येत असतात.त्यामुळे त्यांना अधिकाधिक सोयी-सुविधा उपल्बध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील,असे नूतन अध्यक्ष सौ. विजयमाला पाटील व उपाध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले.![]()

![]()









































































