Last Updated on 22 May 2025 7:44 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । राज्य पोलीस दलातील 22 पोलीस अधीक्षक आणि उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर सिंधुदुर्ग, धाराशिव, रायगड अशा बड्या जिल्ह्यांचा समावेश आहे.
धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची बदली झाली असून त्यांच्या जागी सांगली येथील अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती झाली आहे.
रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली अहिल्यानगरला झाली. तर अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची बृहन्मुंबईला पोलीस उपायुक्त म्हणून वर्णी लागली आहे. सोमनाथ घार्गे यांच्या बदलीनंतर आंचल दलाल यांची रायगडच्या पोलीस अधीक्षक पदी निवड झाली आहे.













































































