Last Updated on 21 Jun 2023 8:48 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली : तलाठी पदभरतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मदत कक्ष
अधोरेखित ऑनलाइन डेस्क । राज्यात तब्बल 4 हजार 625 जागांची तलाठी पदासाठी लवकरच भरती केली जाणार आहे.तशी तयारी प्रशासनाकडून सुरु झाली आहे.तलाठी भरतीबाबत मार्गदर्शन करण्याकरिता विभागस्तरावर व जिल्हास्तरावर मदत कक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्यात बाबत अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक,भूमी अभिलेख पुणे यांच्याकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत.त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात मदत कक्ष (हेल्प डेस्क) सुरु करण्यात येत आहेत.
महसूल व वन विभागाच्या आदेश म्हटले आहे की,महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण 4 हजार 625 पदांच्या सरळसेवा भरती करता राज्यातील एकूण 36 जिल्ह्यात ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे.
व्हायरल झालेल्या जाहिरातीत म्हटले आहे की, विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच जाहिरातीची माहिती https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या लिंकवर उपलब्ध होणार आहे.तसेच सदर जाहिरात सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे.त्यामुळे पदसंख्या आणि आरक्षणामध्ये बदल झाल्यास याबाबतची घोषणा, सूचना वेळोवेळी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनांच्या आधारे प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.
सांगली : तलाठी पदभरतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मदत कक्ष
सांगली : जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या आस्थापनेवरील तलाठी पदभरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या अडी अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात मदत कक्ष (हेल्प डेस्क)स्थापन करण्यात येत आहे.
सांगली जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी पदभरतीचे अनुषंगाने महसूल व वन विभाग यांचेकडील पत्र जा. क्र. तलाठी 2022/प्र.क्र. 190/ई-10 दि. 15/12/2022 अन्वये तलाठी (गट-क) संवर्गाची सरळसेवा पदभरती प्रक्रीया राबवून संपूर्ण भरती प्रक्रीया पार पाडण्यासाठी शासन स्तरावरुन जाहिरात प्रसिध्दी देण्यात येणार असून, तलाठी पदभरतीसाठी अर्ज करणा-या उमेदवारांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी तसेच त्यांना मार्गदर्शन करणेकरीता विभागस्तरावर व जिल्हास्तरावर मदत कक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्याबाबत मा. अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमि अभिलेख पूणे यांचेकडील पत्र क्र.तलाठी भरती/प्र.क्र.31/2023 दि. 25/05/2023 अन्वये सूचना प्राप्त झाल्या आहेत.
त्याअनुषंगाने या प्रसिध्दीपत्रकाव्दारे “जिल्हाधिकारी कार्यालय सांगली” करीता तलाठी पदभरतीसाठी अर्ज करणा-या उमेदवारांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी तसेच त्यांना मार्गदर्शन करणेकरीता खालीलप्रमाणे मदत कक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्यात येत आहे.










































































