Last Updated on 11 Feb 2025 10:57 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांची बदली
मुंबई : राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच असून आजही बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये सांगलीचे जिल्हाधिकारी मंतदा राजा दयानिधी यांची सिडकोच्या सहव्यवस्थापकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी ‘सारथी’चे एमडी अशोक काकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशोक काकडे सांगली जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी असणार आहेत.
महाराष्ट्रात बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरुच आहे. महाराष्ट्र सरकारने 11 फेब्रुवारी रोजी 4 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. तर मागच्या 40 दिवसात 27 बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या बदल्यामुंळे प्रशासकीय पातळीवर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. 2 जानेवारी 2025 रोजी 10 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. 4 फेब्रुवारी 2025 रोजी एकाचवेळी 13 IAS अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तर आज 11 फेब्रुवारी रोजी चार अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
डॉ कुणाल खेमनार, आयुक्त साखर, पुणे यांची बदली जॉइंट सीईओ एमआयडीसी, मुंबई येथे करण्यात आली आहे. डॉ मंतदा राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली यांची जॉइंट एमडी सिडको नवी मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.
अशोक काकडे हे भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) कार्यरत एक वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांनी नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्य केले आहे. मार्च 2020 मध्ये त्यांची छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मनुष्यबळ विकास संस्थेच्या (सारथी) व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली. आणि आता त्यांची सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासनातील त्यांच्या दीर्घ अनुभवामुळे, त्यांनी विविध पदांवर महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
नूतन जिल्हाधिकारी काकडे हे सांगली जिल्ह्यात 2003 ते 2006 या कालावधीत निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यावेळी सांगलीत पहिला महापूर आला होता. ८ दिवस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ऑफिस च्या आवारात पाणी होते त्यांनी या आपत्तीचा सामना कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांसह मोठ्या हिमतीने केला होता. व सर्व तालुक्यातही कुशलपणे मॉनेटरिंग करून सर्व जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आणली होती. शासनाकडून व विविध संस्थाकडून त्यावेळी प्रचंड प्रमाणात मदत प्राप्त होत होती. त्याचे नियोजनबद्धरित्या व्यवस्थित वाटप केले होते.
कोणत्या अधिकाऱ्याची कुठे बदली?
1. डॉ कुणाल खेमनार, आयुक्त साखर, पुणे यांची बदली एमआयडीसीचे सहव्यवस्थापक म्हणून करण्यात आली आहे.
2. मंतदा राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली यांची सिडकोच्या सहव्यवस्थापक पदावर येथे बदली करण्यात आली आहे.
3. अशोक काकडे, एमडी सारथी यांची जिल्हाधिकारी सांगली येथे बदली करण्यात आली आहे.
4. अनमोल सागर, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बदली भिवंडी निजामपूर मनपा आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 04 May 2026 3:13 PM by Sanjay Patil/Adhorekhit सिसिलिया कार्व्हालो, विवेकानंद गोपाल, सुरेंद्र दरेकर, रणधीर शिंदे, अनंत कदम यांचा समावेश ईश्वरपूर । राज्याचे माजी मंत्र... Read more










































































