Last Updated on 28 Aug 2024 3:00 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | केंद्र सरकारने 24 ऑगस्ट रोजी ‘एकीकृत निवृत्तिवेतन योजना’ (Unified Pension Scheme) घोषित केली. त्याच धर्तीवर प्रस्तावित ‘सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना’ ऐवजी महाराष्ट्र राज्यामध्ये ही योजना (Unified Pension Scheme) जशीच्या तशी लागू करण्यात येत आहे. तसेच या अनुषंगाने येणाऱ्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात येत आहे, असे वित्त विभागाने कळविले आहे
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या एकीकृत निवृत्तिवेतन योजनेची मार्गदर्शक तत्त्वे केंद्र सरकारच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात लागू करण्याकरिता ‘वित्त विभागास’ प्राधिकृत करण्यात येत आहे.
केंद्राच्या युनिफाइड निवृत्तीवेतन योजनेची ठळक वैशिष्ट्ये :
- आश्र्वासित निवृत्तीवेतन : 25 वर्षांच्या किमान पात्रता सेवेसाठी सेवानिवृत्त होण्यापूर्वीच्या 12 महिन्यांत काढलेल्या सरासरी मूळ वेतनाच्या 50 टक्के हे वेतन किमान 10 वर्ष इतक्या कमी सेवा कालावधीसाठी प्रमाणानुसार असेल.
- आश्र्वासित कौटुंबिक निवृत्तीवेतन: कर्मचाऱ्याच्या निधनापूर्वीच्या निवृत्तीवेतनाचे 60 टक्के.
- आश्र्वासित किमान निवृत्तीवेतन : किमान 10 वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्यावर रुपये 10,000 दरमहा.
- महागाई निर्देशांक: आश्र्वासित निवृत्तीवेतनावर, आश्र्वासित कौटुंबिक निवृत्तीवेतनावर आणि आश्र्वासित किमान निवृत्तीवेतनावर सेवा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत औद्योगिक कामगारांसाठी (AICPI-IW) अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई सवलत
- ग्रॅच्युइटी व्यतिरिक्त सेवानिवृत्तीवर एकरकमी देयक. प्रत्येक पूर्ण केलेल्या सहा महिन्यांच्या सेवेसाठी सेवानिवृत्तीच्या तारखेनुसार मासिक वेतनाच्या 1/10 भाग (वेतन + महागाई भत्ता) हे आश्वासित निवृत्तीवेतनाचे प्रमाण कमी करणार नाही.










































































