Last Updated on 04 Oct 2023 4:00 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्रिपदाच्या वाटपाची चर्चा सुरू होती.सरकारमध्ये अजित पवार यांच्या गटाचा सहभाग झाल्यानंतर या पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात संघर्षही सुरू असल्याचे बघायला मिळाले.या पार्श्वभूमीवर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी बुधवारी जाहीर केली.या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.तर चंद्रकांत दादा पाटील यांना पुण्याऐवजी सोलापूर आणि अमरावतीचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.
हसन मुश्रीफ कोल्हापूरचे पालकमंत्री
त्याशिवाय कोल्हापूरचे पालकमंत्रीपद हसन मुश्रीफ यांना देण्यात आले आहे.बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आलेले आहे.त्याचवेळी नाशिक,सातारा आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप कायम आहे.
अजित पवार गटातील आमदारांना झुकते माप
एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेलेले असताना दुसरीकडे अजित पवार हे नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.मागील अनेक दिवसांपासून अजित पवार हे पुणे,सातारा आणि रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही होते.अखेर काल दिल्लीत पार पडलेल्या बैठकीनंतर पुण्याचे पालकमंत्री पद हे अजित पवारांना देण्यात आले.दरम्यान, अजित पवार गणेशोत्सवादरम्यान वर्षा बंगल्यावर गणरायाच्या दर्शनासाठी गेले नव्हते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.दरम्यान,अजित पवार गणेशोत्सवादरम्यान वर्षा बंगल्यावर गणरायाच्या दर्शनासाठी गेले नव्हते.काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला अजित पवार उपस्थित राहिले नव्हते.यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चेला अधिक जोर मिळाला होता.पण, आता पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर झाल्यानंतर अजित पवार गटातील आमदारांना झुकते माप देण्यात आल्याचे दिसत आहे.
सुधारित 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे
पुणे- अजित पवार
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
वर्धा – सुधीर मुनगंटीवार
भंडारा- डॉ.विजयकुमार गावित
बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर- हसन मुश्रीफ
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
बीड- धनंजय मुंडे
परभणी- संजय बनसोडे
नंदुरबार- अनिल पाटील









































































