Last Updated on 02 Jan 2025 9:09 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांनाही (IAS) पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच, पुणे, सातारा जिल्हाधिकारीही बदलण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव व्ही. राधा यांच्या आदेशाचे पत्र जारी करण्यात आले आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना पदोन्नती देत त्यांची बदली करण्यात आली आहे. दिवसे यांच्याजागी साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना पदभार देण्यात आला आहे. तर, साताऱ्याच्या जिल्हाधिकारीपदी पुण्यातील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांना पदोन्नती देत भूमी अभिलेख विभागाच्या जमाबंदी आयुक्तपदी करण्यात आली आहे.
मिलिंद म्हैसकर यांना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यभार देण्यात आला आहे. तर, वेणुगोपाल रेड्डी यांना उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि वन विभागाच्या अतिरिक्त सचिवपदी जबाबदारी देण्यात आली आहे. विकास चंद्र रस्तोगी प्रधान सचिव, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग., मंत्रालय, मुंबई यांना प्रधान सचिव (कृषी), कृषी आणि एडिएफ विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.कुंदन प्रधान सचिव, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांची प्रधान सचिव (कामगार), उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
हेही वाचा – पुणे जिल्हाधिकारी पदी जितेंद्र डूडी रुजू
विनिता वैद सिंगल प्रधान सचिव (कामगार), उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई यांना प्रधान सचिव, पर्यावरण आणि हवामान बदल विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. डॉ.हर्षदीप कांबळे यांना प्रधान सचिव, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.डॉ. निपुण विनायक प्रकल्प संचालक, RUSA, उच्च तंत्रशिक्षण विभाग, मुंबई यांना सचिव (1), सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई नियुक्त करण्यात आले आहे. जयश्री भोज व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई यांची सचिव, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
एच.एस.सोनवणे यांची नियुक्ती आयुक्त, क्रीडा आणि युवक, पुणे म्हणून करण्यात आली आहे.
हेही वाचा – राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले ‘हे’ निर्णय











































































