Last Updated on 18 Jan 2025 10:36 PM by Sanjay Patil/Adhorekhit
बीडबाबत मोठा निर्णय : धनंजय मुंडेंचा पत्ता कट, अजितदादा बीडचे पालकमंत्री
मुंबई । राज्यभरातील पालकमंत्र्यांच्या नियुक्तीचा शासन निर्णय आज शनिवारी जारी करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहर जिल्हा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोपविण्यात आले आहे. मंत्री धनंजय मुंडेंना यादीतून वगळण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर बीड जिल्ह्यात चांगलंच राजकारण तापलं होतं. यावरून धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपद देण्यास बीड जिल्ह्यातील आमदारांनी विरोध केला होता. त्यानंतर आता बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांना कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलेलं नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे जालना जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे.
मुंबई उपनगर व कोल्हापूरचे पालकमंत्रिपद विभागून
आशिष शेलार व मंगलप्रभात लोढा यांना मुंबई उपनगरचे पालकमंत्रिपद विभागून देण्यात आले आहे. मंगलप्रभात लोढा हे सह-पालकमंत्री असतील. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात प्रकाश आबिटकर यांना पालकमंत्री तर, माधुरी मिसाळ यांना सह-पालकमंत्री बनविण्यात आले आहे. आशिष जैस्वाल हे गडचिरोलीचे सह-पालकमंत्री असणार आहेत.
सांगलीच्या पालकमंत्री पदी चंद्रकांतदादा पाटील

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील भाजपसह विरोधी पक्षातील नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे सबंध आहेत. ग्रामीण विकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. पण चंद्रकांतदादा पाटील यांच्या खांद्यावर सांगलीचे पालकत्व सोपविण्यात आले आहे.
याशिवाय, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नागपुर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोपविण्यात आले आहे. तर, राधाकृष्ण विखे-पाटील अहिल्यानगर, हसन मुश्रीफ वाशिम, चंद्रकांत पाटील सांगली, गिरीश महाजन नाशिक, गणेश नाईक पालघर, गुलाबराव पाटील जळगाव, संजय राठोड यवतमाळ, उदय सामंत रत्नागिरी, जयकुमार रावल धुळे, पंकजा मुंडे जालना, अतुल सावे नांदेड, अशोक उईके चंद्रपूर,
शंभुराज देसाई सातारा, आदिती तटकरे रायगड, शिवेंद्रसिंह भोसले लातूर, माणिकराव कोकाटे नंदुरबार, जयकुमार गोरे सोलापूर, नरहरी झिरवळ हिंगोली, संजय सावकारे भंडारा, संजय शिरसाट छत्रपती संभाजी नगर, प्रताप सरनाईक धाराशिव, मकरंद जाधव बुलढाणा, नितेश राणे सिंधुदूर्ग, आकाश फुंडकर अकोला, बाबासाहेब पाटील गोंदिया, पंकज भोयर वर्धा आणि मेघना बोर्डीकर हे परभणीचे पालकमंत्री असतील.
यासोबतच यंदा काही जिल्ह्यांना सह पालकमंत्री पदही देण्यात आले आहेत. यात गडचिरोलाला आशिष जयस्वाल हे सह पालकमंत्री असतील. मुंबई उपनगर जिल्ह्यात आशिष शेलार हे पालकमंत्री आणि मंगल प्रभात लोढा सहपालकमंत्री असतील. तर, कोल्हापूर जिल्ह्यात प्रकाश आबिटकर हे पालकमंत्री आणि माधुरी मिसाळ हे सहपालकमंत्री असतील.
पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी
1. गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
2. ठाणे – एकनाथ शिंदे
3. मुंबई शहर – एकनाथ शिंदे
4. पुणे – अजित पवार
5. बीड – अजित पवार
6. नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
7. अमरावती चंद्रशेखर बावनकुळे
8. अहमदनगर – राधाकृष्ण विखे पाटील
9. वाशिम – हसन मुश्रीफ
10. सांगली – चंद्रकांत पाटील
11. नाशिक – गिरीश महाजन
12. पालघर – गणेश नाईक
13. जळगाव -गुलाबराव पाटील
14. कोल्हापूर – प्रकाश आबिटकर तर सह पालकमंत्री – माधुरी मिसाळ
15. मुंबई उपनगर – आशिष शेलार तर सहपालकमंत्री – मंगलप्रभात लोढा
16. रत्नागिरी – उदय सामंत
17. धुळे – जयकुमार रावल
18. जालना – पंकजा मुंडे
19. नांदेड – अतुल सावे
20. चंद्रपूर – अशोक उईके
21.सातारा – शंभूराज देसाई
22. रायगड – आदिती तटकरे
23.लातूर – शिवेंद्रराजे भोसले
24. नंदूरबार – माणिकराव कोकाटे
25.सोलापूर – जयकुमार गोरे
26. हिंगोली – नरहरी झिरवाळ
27. भंडारा – संजय सावकारे
28. छत्रपती संभाजीनगर – संजय शिरसाट
29. धाराशिव – प्रताप सरनाईक
30. बुलढाणा – मकरंद जाधव
31. सिंधुदुर्ग – नितेश राणे
32. अकोला – आकाश फुंडकर
33. गोंदिया -बाबासाहेब पाटील
34. यवतमाळ – संजय राठोड
35. वर्धा – पंकज भोयर
36.परभणी – मेघना बोर्डिकर













































































