Last Updated on 26 Nov 2024 7:17 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । राज्यसभेच्या ४ राज्यांमधल्या ६ जागांसाठी येत्या २० डिसेंबरला मतदान होणार आहे. निवडणूक आयोगानं आज या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. मतमोजणीही २० डिसेंबरला संध्याकाळी सुरु होईल.
आंध्रप्रदेशमधल्या ३, तसंच ओदिशा, पश्चिम बंगाल आणि हरयाणाच्या प्रत्येकी एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे.
या निवडणुकीसाठी १० डिसेंबर ही नामांकनाची अंतिम तारीख आहे. तर ११ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. १३ डिसेंबरपर्यंत नावे मागे घेण्याची मुदत आहे. २० डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.











































































