Last Updated on 27 Oct 2023 10:36 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । ऊसाला दुसरा हप्ता प्रतिटन 400 हप्तासाठी व राज्यातील साखर कारखान्याचे वजन काटे आँनलाईन व डिजिटल करावेत.या प्रमुख मागणीसाठी 17 आक्टोबर पासून मा.खा. राजु शेट्टी पायी यात्रेसाठी सुरवात झाली असून आज (शनिवारी) सांगली जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव यांनी दिली.
यावेळी जाधव पुढे म्हणाले की,गेल्या महिनाभरापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 1 जुलै पासून जनजागृती अभियानाला सुरुवात केली आहे.13 सप्टेंबर रोजी उपप्रादेशिक साखर आयुक्त कोल्हापूर कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला होता. तर 2 आक्टोबर गांधी जयंतीच्या सांगली जिल्ह्यातील प्रत्येक साखर कारखान्यावर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले होते.तरीही साखर कारखान्याना जाग येत नव्हती.म्हणुन मा.खा. राजू शेट्टींनी कोल्हापूर व सांगली,सातारा जिल्ह्यातील 522 किलोमीटर अंतरच्या पायी प्रवास करण्याचा निश्चित करण्यात आला होता.
हेही वाचा – कोयना धरणातून 2100 क्युसेक विसर्ग सुरू
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात ही यात्रा आज प्रवेश करणार असुन आज दि.28 आक्टोबर निनाई दालमिया शुगर करंगळी 29 रोजी विश्वासराव नाईक साखर कारखाना चिखली,30 आक्टोबर रोजी राजारामबापू पाटील साखर कारखाना युनिट क्रमांक 2 वाटेगाव,31 आक्टोबर सातारा जिल्ह्यातील कृष्णा सहकारी साखर कारखाना शिवनगर ,1 नोव्हेंबर रोजी राजारामबापू पाटील साखर कारखाना साखराळे,व क्रांती सहकारी साखर कारखाना कुंडल तर 2 नोव्हेंबर हुतात्मा किसन अहिर साखर कारखाना वाळवा,4 नोव्हेंबर रोजी वसंतदादा सहकारी साखर कारखाना सांगली 5 नोव्हेंबर सर्वोदय सहकारी राजारामबापू युनिट क्रमांक 3 या प्रमुख साखर कारखान्यावर पदयात्रा जाणार असुन पुढे कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करणार 7 नोव्हेंबर जयसिंगपुर येथे ऊस परिषदेत ऊस दराची व आंदोलनाची दिशा ठरणार आहे.
गावागावातून घरची भाकरीची शिदोरी
पदयात्रेचा मुक्काम बिळाशी,पाडळी,तांबवे,रेठरे हरणाक्ष,कुंडल,वाळवा नांद्रे,तुंग या गावात मुक्काम होणार असून या गावातील व आजुबाजुच्या खेडेगावातुन प्रत्येक घरटी दोन भाकरी व सुकी भाजी गोळा करून पदयात्रेतील शेतकऱ्यांची जेवणाची सोय करण्यात येणार आहे.जो पर्यंत 400 दुसरा हप्ता मिळतं नाही तोपर्यंत ऊसतोड घेऊ नका.असे आवाहन करण्यात आले आहे.











































































