Last Updated on 08 Sep 2024 1:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सोमवारी सिने अभिनेते भरत जाधव यांचे ‘तू तू मी मी’ नाटक
सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सांस्कृतिक मंडळाच्या वतीने ९ सप्टेंबर रोजी रात्री सिनेअभिनेते भरत जाधव यांचे ‘तू तू मी मी’नाटक,१२ सप्टेंबर रोजी रात्री हालगी वाजते,पाव्हनं जेवला का, पाटलांचा बैलगाडा फेम महाराष्ट्राची लोक गायिका ‘राधा खुडे-तरटे यांचा ऑर्केस्ट्रा’,तर १६ सप्टेंबर रोजी रात्री सिने अभिनेत्री अदिती सारंगधर,अभिनेते आस्वाद काळे यांचे ‘मास्टर माईंड’हे नाटक होणार आहे.
११ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ.इंद्रजित देशमुख (काकाजी) यांचे खास व्याख्यान आयोजित केले आहे. सांस्कृतिक मंडळाच्या सर्व दर्जेदार व भरगच्च कार्यक्रमां चा लाभ घ्यावा,असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी केले.
ह.भ.प.दिगंबर यादव बावची यांचे सुश्राव्य कीर्तन व भजन,प्रा.सूरज चौगुले साखराळे यांचे जगणं सुंदर आहे,श्री.युवराज पाटील गारगोटी यांचे चला नाती घडवू या विषयावर व्याख्याने आणि श्री.जयवंत आवटी कुंडल यांचे कथाकथन होणार आहे. तसेच कामगारांचा कलाविष्कार,राजारामबापू मॅरेथॉन,रस्सीखेचसह धावणे,स्लो सायकल, कॅरम,बुध्दीबळ,डॉच बॉल आदी स्पर्धा होणार आहेत. महिलांच्यासाठी गौरी गणपती, उखाणे,रांगोळी,लिंबू-चमचा,संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.
सांस्कृतिक मंडळाचे कार्याध्यक्ष आर.डी. माहुली,करमणूक समितीचे अध्यक्ष कार्तिक पाटील,जिमखाना समितीचे अध्यक्ष दादासो मोरे,सचिव विश्वनाथ पाटसुते,कामगार नेते शंकरराव भोसले,तानाजीराव खराडे,युनियन अध्यक्ष राजेंद्र चव्हाण,कामगार कल्याण अधिकारी महेश पाटील,खजिनदार संजय सत्रे,सिव्हिल इंजिनिअर प्रेमनाथ कमलाकर, सुरक्षाधिकारी विरसेन गायकवाड,गेस्ट हाऊस इनचार्ज संदीप घनवट यांच्यासह मंडळाचे सदस्य,अधिकारी व कर्मचारी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.










































































