Last Updated on 12 Oct 2023 8:30 AM by Sanjay Patil/Adhorekhit
प्रतिकदादा पाटील यांच्या हस्ते 6 कामगारांना प्रातिनिधिक या योजनेचे हेल्थ कार्ड वाटप
ह्र्दय विकारांपासून अगदी सामान्य आजारपर्यंत वेग-वेगळे आर्थिक सहाय्य मिळणार
सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष,युवा नेते प्रतिकदादा पाटील यांनी स्वतः लक्ष घालत,साखर कामगारांना कोणतीही तोषिस न लागू देता,सर्व कामगारांच्यासाठी आरोग्य योजना लागू केली आहे.प्रतिकदादा पाटील यांच्या हस्ते 6 कामगारांना प्रातिनिधिक या योजनेचे हेल्थ कार्ड वाटप करण्यात आले.साखर कामगारांनी या योजनेबद्दल समाधान व आनंद व्यक्त केला.
संदीप यादव केनयार्ड,संभाजी पाटील को जन,अर्जुन मोरे कोजन,कृष्णात कदम को जन,विनोद भिलवडे उत्पादन,विशाल बर्गे उत्पादन या 6 कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक हेल्थ कार्ड वाटप करण्यात आले.याप्रसंगी एच आर मॅनेंजर अनिलकुमार पाटील,डॉ.प्रकाश म्हाळुंगकर,बेळगाव येथील केएलई हॉस्पिटल चे हरिकृष्ण भट,सहाय्यक कामगार कल्याण अधिकारी संदीप कदम प्रामुख्याने उपस्थित होते.
हेही वाचा – ई पीक पाहणीसाठी 15 ऑक्टोबरपर्यंतची डेडलाइन…अन्यथा मिळणार नाहीत हे लाभ
सध्याच्या काळात आरोग्य खर्च सर्व सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर गेला असून काही आजारात अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत आल्याचे पहायला मिळते.त्यामुळे कारखान्याचे अध्यक्ष,युवा नेते प्रतिकदादा पाटील यांनी स्वतः लक्ष घालत कारखान्यातील सर्व कामगारांच्यासाठी आरोग्य योजना लागू केली आहे.सांगली,कोल्हापूर,सातारा व बेळगाव या जिल्ह्यातील 75 हॉस्पिटल मध्ये कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधा मिळणार आहेत.ह्र्दय विकारांपासून अगदी सामान्य आजारपर्यंत वेग-वेगळे आर्थिक सहाय्य कर्मचाऱ्यांना होणार आहे.या योजनेसाठी बेळगाव येथील केएलई हॉस्पिटलशी करार केला आहे.










































































