Last Updated on 19 Apr 2025 10:51 PM by Sanjay Patil/Adhorekhit

सांगली । देशातील सहविज निर्मिती प्रकल्पांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने पुणे येथील शानदार सोहळ्यात राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्यास ”सर्वोत्कृष्ठ सहविज निर्मिती प्रकल्प’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सहकार क्षेत्राचे अर्ध्ववू,को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष,राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील,राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी हा पुरस्कार स्विकारला. माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी या समारंभास हजेरी लावत राजारामबापू साखर कारखान्या चे अध्यक्ष-उपाध्यक्ष व संचालक मंडळाचे कौतुक केले. ऊर्जा क्षेत्रातील या पुरस्काराने कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात आला आहे.
को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष प्रकाश साळुंखे-दांडेगावकर, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील,भारत सरकारच्या शास्त्रज्ञ डॉ.संगीता कस्तुरे,प्रतापराव पवार,विस्माचे अध्यक्ष बी. बी.ठोंबरे, दिनेश जगदाळे, नरेंद्र मोहन, संजय खताळ यांच्यासह सहकार क्षेत्रातील दिग्गज विभूती या समारंभास उपस्थित होते.
कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील, संचालक प्रदीपकुमार पाटील,कार्तिक पाटील, शैलेश पाटील,दादासो मोरे,दिलीपराव देसाई, कार्यकारी संचालक आर.डी.माहुली,जनरल मॅनेंजर एस.डी.कोरडे,जनरल मॅनेंजर विजय मोरे,को-जन मँनेजर उमेश सुतार प्रामुख्याने उपस्थित होते.
कारखान्याने वसंतदादा इन्स्टिट्यूट आणि राज्य साखर संघाचे अनेक पुरस्कार पटकावून राज्य व देशपातळीवर आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. “हे यश संचालक मंडळ, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांच्या एकदिलाने केलेल्या प्रयत्नाचे फलित आहे,” अशी प्रतिक्रिया अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी यावेळी दिली.
![]()














































































