Last Updated on 19 Oct 2023 6:41 PM by Sanjay Patil/Adhorekhit
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांची माहिती
सांगली । आपल्या साखर कारखान्याने साखराळे युनिटचा विस्तारवाढ व वीज प्रकल्पाच्या उभारणीसाठी 147 रुपयांची ठेव घेतली होती.त्यातील 75 रुपये दिवाळीपूर्वी,तर उर्वरित 72 रुपये मार्च महिन्यात देणार असल्याची माहिती राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष,युवा नेते प्रतिकदादा पाटील यांनी सभासद संपर्क दौऱ्यात बोलताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली.
प्रतिकदादा पाटील यांनी रेठरेहरणाक्ष,बुर्ली,तुपारी,दह्यारी,घोगाव,दुधोंडी,पुणदी, नागराळे या गावांचा सभासद संपर्क दौरा करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. या दौऱ्यात कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील,शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील,सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार,माजी जि.प.अध्यक्ष देवराज पाटील,संचालक दादासाहेब मोरे,मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील,ऊस विकास अधिकारी सुजयकुमार पाटील,गटाधिकारी अजित जाधव उपस्थित होते.
प्रतिकदादा पाटील पुढे म्हणाले,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी आपल्या साखर कारखान्याची ऊस तोडणी यंत्रणा व वाहतूक व्यवस्था अचूक करण्याचा प्रयत्न केला आहे.पूर्वी आपण शेती विभागाच्या कर्मचाऱ्यांना मोबाईल ऍपवर 100 शेतकऱ्यांची नांवे देत होतो.मात्र सध्या आपण केवळ 25 नांवे देत आहोत. त्यामुळे कोणतीही कर्मचारी ऊस तोड कार्यक्रमातील शेतकऱ्यांची नांवे खाली वर करू शकत नाही.जर काही रस्त्या सारखी काही अडचण असल्यास गटाधिकारी व मुख्य शेती अधिकारी स्वतः त्याची पडताळणी करणार आहेत.आम्ही ठिबक सिंचन,ड्रोनद्वारे औषध फवारणी,क्षारपड सुधारणा योजना,मल्टीस्पेक्ट्रम ड्रोनद्वारे पिकांचे आरोग्य तपासणी आदी उपक्रम राबवित आहोत.यातून निश्चितपणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊसाचे एकरी उत्पादन वाढू शकते.
हेही वाचा – राजारामबापू कारखान्याच्या कामगारांसाठी आरोग्य योजना
या सभासद संपर्क दौऱ्यात रेठरेहरणाक्ष,बुर्ली,तुपारी,दह्यारी,घोगाव,दुधोंडी,पुणदी,नागराळे या गावातील ऊस उत्पादक सभासद तसेच त्या-त्या गावातील पदाधिकारी- कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी शेतकऱ्यांनी काही प्रश्न,अडचणी मांडल्या. त्यास प्रतिकदादा व अधिकाऱ्यांनी समाधान कारक उत्तरे दिली.









































































