Last Updated on 17 Apr 2024 6:17 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील श्रीराम मंदीरात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या भक्तिमय आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष,कारखान्याचे संचालक देवराज पाटील,त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.सुप्रिया पाटील या उभयतांच्या हस्ते आरती करण्यात आली.यावेळी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील व भाविक उपस्थित होते. आकर्षक रांगोळीने परिसर, तर आकर्षक रोषणाई आणि फुलांच्या माळांनी श्रीराम मंदीर सजविण्यात आले होते.
सकाळी ह.भ.प.हरिभाऊ महाराज (अमरापूर) यांचे सुश्राव्य किर्तन झाले. त्यांना साखर कामगारांनी उत्तम साथ दिली. यानंतर देवराज पाटील,सौ.सुप्रिया पाटील या उभयतांच्या हस्ते आरती करण्यात आली. याप्रसंगी कामगार कॉलनीतील महिलांनी श्रीराम जन्माचा पाळणा म्हंटल्यानंतर उपस्थित सर्व भाविकांना सुंठवडा व प्रसाद वाटप करण्यात आले.संतोष जोशी (कासेगाव) यांनी सोहळ्याचे पौरोहित्य केले.
यावेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव,शहराध्यक्षा पुष्पलता खरात,कारखान्याचे संचालक प्रताप पाटील,विठ्ठल पाटील,रघुनाथ जाधव, बबनराव थोटे,शैलेश पाटील,रमेश हाके, रामराव पाटील,अतुल पाटील,अमरसिंह साळुंखे,माजी संचालक बाळासाहेब पाटील (धनी) कार्यकारी संचालक आर.डी.माहुली, सचिव डी.एम. पाटील,कामगार नेते शंकरराव भोसले, तानाजीराव खराडे,कामगार संचालक मनोहर सन्मुख,विकास पवार,बांधकाम अभियंता प्रेमनाथ कमलाकर,कामगार कल्याण अधिकारी महेश पाटील,संदीप कदम यांच्यासह अधिकारी व भाविक उपस्थित होते.
सायंकाळी इस्लामपूर येथील गीत रामायण महिला भजनी मंडळाचा सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम झाला. त्याचा भाविक भक्तांनी आनंद घेतला.









































































