Last Updated on 05 Nov 2023 6:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit
‘लक्ष्य एकरी १०० टनांचे’ या उपक्रमाचा परिणाम – प्रतिकदादा पाटील
कारखाना कार्यक्षेत्रात ऊसाचे एकरी सरासरी उत्पादन होते केवळ 28 टन 
सांगली । आपल्या साखर कारखाना कार्यक्षेत्रात ऊसाचे एकरी सरासरी उत्पादन केवळ 28 टन होते.मात्र आपले मार्गदर्शक आ.जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या ‘लक्ष्य एकरी 100 टनांचे’या उपक्रमामुळे ते 45 टनांपर्यंत पोचले आहे.आता आपणास ठिबक सिंचनसह नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून ऊसाचे एकरी सरासरी उत्पादन 55 ते 60 टनांपर्यंत न्यायचे आहे,असा विश्वास राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, युवा नेते प्रतिकदादा पाटील यांनी केले.
वाघवाडी फाटा येथील शिवम पार्क येथे राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना,जैन इरिगेशन सिस्टीम लि.,जळगाव व चातक इनोव्हेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऊस उत्पादन लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान व भरघोस उत्पादन वाढीसाठी जैन ठिबक तंत्रज्ञान’या विषयावर आयोजित ‘शेतकरी परिसंवाद’कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.याप्रसंगी व्हीएसआयचे माजी शास्त्रज्ञ सुरेश माने-पाटील,जैन इरिगेशनचे सचिन पाटील,माजी जि.प.अध्यक्ष देवराज पाटील, माजी जि.प.उपाध्यक्ष रणजित पाटील, कारखान्याचे संचालक शैलेश पाटील, प्रताप पाटील,रामराव पाटील,हणमंत माळी,राजकुमार कांबळे,डॉ.सौ.योजना शिंदे- पाटील,कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विश्वासराव पाटील,माजी संचालक दिलीपराव पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील,युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रतिकदादा पाटील पुढे म्हणाले,एका बाजूला उत्पादन खर्च वाढत असताना आपणास एकरी उत्पादन वाढीवर भर देणे,ही काळाची गरज आहे. त्यासाठी आपण सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प,ड्रोनद्वारे औषध फवारणीसारखे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देत आहोत. आपण प्रत्येक शेतकऱ्यास ऊस शेती मार्गदर्शक पुस्तिका उपलब्ध करून दिल्या आहेत. आपण सर्वांनी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या शेतातील एकरी उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा.
यावेळी व्हीएसआयचे माजी शास्त्रज्ञ सुरेश माने-पाटील यांनी ‘आधुनिक शेती’या विषयावर माहिती दिली. जैन इरिगेशनचे सचिन पाटील यांनी ‘ठिबक सिंचना’ची माहिती दिली.
प्रारंभी जैन ठिबकचे आनंद गुळदगड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी श्री.चव्हाण,कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील,ऊस विकास अधिकारी सुजय पाटील,राजाराम बापू दूध संघाचे संचालक संजय शिंदे,माजी प.स.सदस्य शंकराव चव्हाण,जैन इरिगेशनचे जावेद इनामदार,महेश खोत,रोशन देसाई, गणेश पाटील,विकास जाधव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. सुरेश मगदूम यांनी आभार मानले.![]()












































































