Last Updated on 01 Jan 2024 7:02 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील राम मंदीरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अयोध्येतील प्रभू रामचंद्र मंदीरातील अक्षता कलशाचे मोठया उत्साहात स्वागत करून विधिवत पूजन करण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तसेच राजारामबापू उद्योग समूहातील पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्रीराम,जय राम,जय जय रामाच्या उद्घोषात राम मंदीरा तील वातावरण अगदी भक्तिमय होऊन गेले.
उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदीर उभा करण्यात आले असून या मंदीरात दि.२२ जानेवारी २०२४ रोजी मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात येणार आहेत. यानिमित्त संपूर्ण देशात गावोगावी अक्षता कलशाचे पूजन करण्यात येत आहे.या अक्षता कलशाचे कारखाना कार्यस्थळावरील राम मंदीरात आ.जयंत पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
सोमवारी सकाळी इस्लामपूर येथील राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र न्यास समितीचे राम सेवक डॉ.प्रमोद कणप,अजित जाधव,अथर्व भागवत,तुषार भूतकर आदी कार्यकर्ते अक्षता कलश घेवून राम मंदीरात आले.यावेळी आ. जयंत पाटील यांच्या हस्ते अक्षता कलशाचे विधिवत पूजन करण्यात आले. कासेगावचे संतोष जोशी यांनी या सोहळ्याचे पौरोहित्य केले.यावेळी आरत्या घेण्यात आल्या.
राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर. पाटील,प्रा.शामराव पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,अँड.चिमण डांगे,शहाजी पाटील,माजी नगराध्यक्षा सौ. अरुणादेवी पाटील,माजी उपनगराध्यक्ष दादासो पाटील,खंडेराव जाधव,अरुण कांबळे,संदीप पाटील,सुभाषराव सुर्यवंशी, राजारामबापू सह.बँकेचे उपाध्यक्ष विजयराव यादव,राजारामबापू सह.दूध संघाचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,संजय पाटील,महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, आष्टयाचे दिलीपराव वग्याणी,विराज शिंदे, माजी उपसभापती नेताजीराव पाटील,संग्राम जाधव,देवराज देशमुख यांच्यासह इस्लामपूर, आष्टा तसेच तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









































































