Last Updated on 14 Nov 2024 6:43 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । महाविकास आघाडीचे उमेदवार,राज्याचे नेते आ.जयंत पाटील यांचे धाकटे चिरंजीव राजवर्धन पाटील यांनी गेल्या ४-५ दिवसापासून इस्लामपूर शहरात दररोज सकाळी प्रचार फेऱ्या,दुपारी बैठका आणि रात्री कोपरा सभांचा धडाका लावत प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे.भैय्या, आमच्याकडे यायचीही गरज नाही. आम्ही साहेबांच्याबरोबर होतो आणि आहे. आमचे मत फक्त साहेबांनाच,अशा भावना शहरातील मतदारांनी त्यांच्याकडे व्यक्त केल्या.
साठेनगर येथून पदयात्रेची मोठया उत्साहात सुरुवात करण्यात आली. आंबेडकर नगर,उरण भाग,शिवाजी चौक,तानाजी चौक, शाहूनगर,यशोधन नगर,क्रांतिसिंहनगर, हनुमाननगर,शुभम कॉलनी,कापुसखेड नाका, यल्लामा चौक,संभाजी चौक,जावडेकर चौक, शिवनगर,किसाननगर,गणेश मंडई,अकबर मोहल्ला,आझाद चौक आदी शहरातील सर्व भागातून प्रचार फेरी काढण्यात आली.
राजवर्धन पाटील म्हणाले,इस्लामपूर शहरात जो काय विकास झाला आहे,तो साहेबांनी केलेला आहे. अलीकडे साहेबांनी शहरातील विकास कामांना ११० कोटीचा निधी दिला आहे. या शहरानेही साहेबांना सातत्याने ताकद दिली आहे.कोणत्याही परिस्थितीमध्ये साहेबांना मोठे मताधिक्य द्यायचेच,असा चंग बांधून आमचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

शहराध्यक्ष शहाजी पाटील,अँड.चिमण भाऊ डांगे,पै.भगवान पाटील,दादासाहेब पाटील,खंडेराव जाधव,अँड.धैर्यशिल पाटील, विश्वनाथ डांगे,सुभाषराव सुर्यवंशी,डॉ.संग्राम पाटील,शैलेश पाटील,संदीप पाटील,अरुण कांबळे,शंकरराव पाटील,राजकुमार कांबळे, पिरअली पुणेकर,संजय पाटील (धनी),पोपट पाटील (सर),युवराज पाटील,महादेव पाटील,परेश पाटील,बंडा वाघमोडे,राष्ट्रीय खेळाडू मनिषा बणेकर,सुवर्णा जगताप, दिग्विजय पाटील,अभिजित रासकर, अभिजित कुर्लेकर, विनायक सदावर्ते, बाळासाहेब कोळेकर, संदीप माने,चंद्रकांत ताटे,विक्रम घाटगे,अभिमन्यू क्षिरसागर, अभिजित पाटील यांच्यासह शहरातील जेष्ठ,युवक,महिला पदाधिकारी,कार्यकर्ते या प्रचार फेऱ्यामध्ये मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभागी झाले होते.









































































