Last Updated on 16 Sep 2023 3:22 PM by Sanjay Patil/Adhorekhit
छत्रपती संभाजीनगर । खासदार संजय राऊत मराठवाड्यातील बैठकीला उपस्थिती लावणार असल्याची चर्चा सुरु होती.खुद्द राऊतांनी यासंदर्भात विधान केले होते.संभाजीनगर येथे आज मंत्रीमंडळाची बैठक पार पडली.या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार भर परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘राऊत नाही आले का,?’ असा सवाल केला.अप्रत्यक्षपणे संजय राऊतांना चिमटा काढला.
मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या दिनानिमित्त शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रीमंडळाची बैठक पार पडली.तब्बल 7 वर्षांनंतर मराठवाड्यात ही बैठक झाली.मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांसह तब्बल 29 मंत्र्यांनी या बैठकीला उपस्थिती लावली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेला संधी मिळाली तर उपस्थित राहू,असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला होता.मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेसाठी संजय राऊत यांना पास दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.तसेच मी संपादक आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ संपादक आहे.तसेच मी वार्ताहरही आहे त्यामुळे माझी इच्छा झाली तर मी जाईन.पण मी गेल्यास गोंधळ होणार,असं संजय राऊत म्हणाले होते.त्यामुळे संजय राऊत पत्रकार परिषदेला जाणार का? असा प्रश्न विचारला जात होता.पण,या पत्रकार परिषदेला राऊत उपस्थित राहिलेच नाहीत.
दरम्यान,तोच धागा पकडून मुख्यमंत्री शिंदे यांनी भर पत्रकार परिषदेत राऊत आले नाहीत का, असा सवाल केला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.यानंतर उपस्थित सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले.
राऊत आले नाही का? असे उपस्थित पत्रकारांकडे बघत एकप्रकारे अप्रत्यक्षपणे संजय राऊतांना चिमटा काढला.त्यानंतर थोडावेळ थांबून मी एका माध्यमांचे प्रतिनीधी विकास राऊत यांच्याबद्दल विचारत असल्याचा खुलासा त्यांनी केला.व लगेच दुसऱ्या विषयाला हात घातला.भर पत्रकार परिषदेत शिंदेंनी संजय राऊतांना काढलेल्या चिमट्याची चर्चा मात्र रंगली आहे.











































































