Last Updated on 19 Oct 2024 10:20 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । तामिळनाडू , पुदुच्चेरी, आणि कर्नाटकसह दक्षिण भारतात येत्या २ ते ३ दिवसात आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर उद्या आणि परवा मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
पश्चिम बंगाल आणि ओडिशा मध्ये २३ आणि २४ तारखेला मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
वायव्य, पश्चिम, मध्य आणि ईशान्य भारतात तुरळक प्रमाणात पाऊस पडेल.
उत्तर अंदमान समुद्रात चक्रीवादळासदृश स्थिती तयार होऊ शकते, त्यामुळे बंगालच्या उपसागरात येत्या २२ तारखेला कमी दाबाचा पट्टा तयार होऊ शकतो, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.











































































