Last Updated on 19 Sep 2024 6:47 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । युवा नेते,राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी गेल्या ५-७ दिवसात इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील अनेक गावातील २०० गणेश मंडळांना भेटी देऊन श्रींच्या आरत्यांचे द्वि शतक पूर्ण केले. गावोगावच्या कार्यकर्त्यांनी विशेषतः युवकांनी फटाक्यांची अतिषबाजी आणि वाद्यांच्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत केले. प्रतिकदादांनी आबाल-वृद्धांना नमस्कार करून,तर युवकांशी हस्तांदोलन करून संवाद साधला. यावेळी युवक,महिला व पुरुष कार्यकर्ते,भाविकांनी त्यांच्या समवेत फोटो घेतले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंत पाटील हे राज्याच्या राजकारणा त व्यस्त आहेत. येत्या विधानसभा निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी आहे. तरीही त्यांनी वाळवा तालुक्यातील आष्टा, इस्लामपूर या मोठ्या शहरासह सांगली शहरा तील शेकडो गणेश मंडळांना भेटी देऊन श्रींच्या आरती केल्या आहेत. कार्यकर्ते व भाविकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
प्रतीक प्रतीक हे गेल्या ४-५ वर्षापासून श्रींच्या आरर्त्यासाठी येत आहेत. तालुक्या तील जनतेने तेंव्हापासूनच त्यांना प्रेम दिले आहे. त्यांनी यावर्षी आरती दौरा करताना ग्रामीण भागास प्राधान्य दिले. त्यांनी दौऱ्याची सुरुवात कासेगावपासून केली. तर दौऱ्याचा समारोप हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोटखिंडीतील गणेश मंडळाच्या आरतीने केला. दरम्यान बावची, बोरगाव,भवानीनगर,दुधारी,क.पिरान, दुधगाव,तुंग आदी गावातील अनेक मंडळांना भेटी देऊन श्रींच्या आरती केल्या.
प्रतिकदादांनी जेष्ठ व वयस्कर कार्यकर्त्यां ना वाकून नमस्कार करीत,तर युवकांशी हस्तांदोलन करीत थेट संवाद साधला. यातील अनेक जेष्ठ कार्यकर्त्यांनी स्व.बापूंच्या आठवणींना उजाळा दिला,तर काहींनी आ.जयंतराव पाटील यांच्या समवेत काम करतानाचे किस्से आवर्जून सांगितले. या दौऱ्यात युवक व महिलांची हजेरी लक्षणीय होती. या दौऱ्यात युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्य क्ष संग्राम जाधव,कार्याध्यक्ष देवराज देशमुख, विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष राजकेदार आटूगडे,उपाध्यक्ष विशाल माने यांच्यासह युवक कार्यकर्ते सहभागी झाले होते.









































































