Last Updated on 19 Oct 2022 12:58 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । मोदी सरकारने काल पीएम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या आणखी एक भेट दिली आहे.मोदी सरकारने 2023-24 च्या रब्बी हंगामासाठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत एमएसपी वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.गव्हाची एमएसपी 2015 रुपयांवरून 2125 क्विंटल म्हणजे 110 रुपयांनी वाढवली आहे. तर हरभर्याचा एमएसपी 1635 वरून 1735 म्हणजे 105 रुपयांनी वाढवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
सन 2023-24 सालासाठी सहा रब्बी पिकांच्या किमान हमीभावाच्या वाढीला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. त्यानुसार गहू, हरभर्याप्रमाणेच इतर महत्त्वाच्या चार रब्बी पिकांचा एमएसपी वाढवला आहे. मसूरचा एमएसपी सर्वाधिक 500 रुपये वाढून 6 हजार रुपये क्विंटल झाली आहे. तर रेपसीड (पांढरी मोहरी) आणि पिवळी मोहरीची एमएसपी प्रति क्विंटल 400 रुपयांनी वाढवून 5050 रुपयांवरून 5450 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. करडईची एमएसपी 5 हजार 441 होता. तो 209 रुपयांनी वाढून 5 हजार 650 रुपये क्विंटल झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या पिकांच्या किमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे.
कृषी तेलबिया आणि कडधान्यांचे उत्पादन वाढवण्यावर सरकार सातत्याने लक्ष केंद्रित करत असून त्याचे परिणामही दिसू लागले आहेत. तेलबियांचे उत्पादन 2014-15 मधील 27.51 दशलक्ष टनावरून 2021-22 मध्ये 37.70 दशलक्ष टनापर्यंत वाढवण्यात यश आले आहे. डाळींचे उत्पादन वाढवण्यातही यश आले आहे.











































































