Last Updated on 04 Jan 2024 5:30 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या रुपात महाराष्ट्राला प्रथमच महिला पोलीस संचालक मिळाल्या आहेत.1988 च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या अधिकारी राहिल्या आहेत.
राज्य सरकारकडून रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीचा अधिकृत अध्यादेश गुरुवारी काढण्यात आला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राज्याच्या पोलिस महासंचालकपदांबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
काही दिवसांपूर्वी फणसळकर यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. पण आता राज्याच्या पोलिस महासंचालकपदी अखेर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रश्मी शुक्ला यांनी यापूर्वी पुण्याचे पोलिस आयुक्त,डीआयजी (प्रशासन),नागपूरच्या एसपी आणि सोलापूरचे डीसीपी अतिरिक्त महासंचालक (वाहतूक), महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), म्हणून काम पाहिले आहे.आता त्यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.









































































