Last Updated on 23 Oct 2024 8:02 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । महाविकास आघाडीकडून विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आघाडी घेतली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अधिकृत ६५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या उमेदवारी यादीत ६५ जणांना तिकीट देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांच्यासह दिग्गजांचा यामध्ये समावेश आहे. मुंबईतील १३ मतदारसंघातील उमेदवार शिवसेना ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून कोपरी मतदारसंघातून केदार दिघे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे मतदारसंघात माजी खासदार राजन विचारे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. चाळीसगावातून माजी खासदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. डोंबिवलीतून दिपेश म्हात्रे, कल्याण ग्रामीणमधून सुभाष भोईर, ओवळा माजिवडातून नरेश मणेरा, कोपरी पाचपाखाडी येथून केदार दिघे, ठाण्यातून राजन विचारे, ऐरोलीतून एम. के. मढवी, मागाठाण्यातून उद्देश पाटेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
नांदगावात शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या विरोधात गणेश धात्रक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मालेगांव बाह्यमधून अद्वय हिरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नाशिक मध्यमधून वसंत गीते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नाशिक पश्चिम मधून सुधाकर बडगुजर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. कल्याण ग्रामीणमधून सुभाष भोईर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.










































































