Last Updated on 07 Jun 2023 1:13 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । मेरी लाईफ अॅपमधील सहभागींची संख्या महिनाभरातच दोन कोटींवर पोहोचली आहे.आपली पृथ्वी राहण्यासाठी एक उत्तम ग्रह बनविण्यासाठी सामूहिक भावनेंच हे प्रतीक आहे,लोकांचा सहभाग उत्सावर्धक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका संदेशात म्हटले आहे.
विश्व पर्यावरण दिवस साजरा करण्याचा हा एक उत्तम मार्ग असल्याचं पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी या अॅपमधील सहभागाची माहिती देताना सांगितले. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पृथ्वीसाठी अनुकूल पर्यायांची निवड करुन शाश्वत जीवनशैली जगण्यासाठी लोकांना अधिक सक्षम करणारं हे मेरी लाईफ मोबाईल अॅप्लिकेशन आहे.
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलेले ट्विट सामायिक करताना पंतप्रधानांनी ट्विट केले:











































































