Last Updated on 28 Oct 2022 11:18 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गृहखात्याची बैठक पार पडली.या बैठकीनंतर राज्यातील पोलीस भरतीबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.पोलीस शिपाई,पोलीस शिपाई चालक पदांची असणार आहेत.राज्यातील सर्वात जास्त जागा या मुंबई पोलिसांत भरल्या जाणार आहेत.
महाराष्ट्र पोलीस विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार येथे पोलीस शिपाई,पोलीस शिपाई चालक पदांच्या एकूण 17 हजार 130 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.पैकी 2 हजार 174 पोलीस शिपाई चालक ही पदे भरली जाणार आहेत.
महाराष्ट्र पोलीस भरती 2022 अंतर्गत पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून अधिकृत अधिसूचना 01 नोव्हेंबर 2022 रोजी जाहीर होईल तर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 03 नोव्हेंबर 2022 पासून सुरु होणार आहे.
पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून या प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. 3 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत भरतीसाठी अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. यासाठी policerecruitment2022.mahait.org आणि WWW.mahapolice.gov.inया संकेतस्थळावर पोलीस भरतीसाठीची माहिती मिळणार आहे. दरम्यान अर्जदार एकाच विभागात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करु शकत नाही. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
भरल्या जाणाऱ्या जागांची जिल्हानिहाय संख्या अशी
मुंबई – 6740, ठाणे शहर – 521, पुणे शहर – 720, पिंपरी चिंचवड – 216, मिरा भाईंदर – 986, नागपूर शहर – 308, नवी मुंबई – 204, अमरावती शहर – 20, सोलापूर शहर- 98, लोहमार्ग मुंबई – 620, ठाणे ग्रामीण – 68, रायगड -272, पालघर – 211, सिंधूदुर्ग – 99, रत्नागिरी – 131, नाशिक ग्रामीण – 454, अहमदनगर – 129, धुळे – 42, कोल्हापूर – 24, पुणे ग्रामीण – 579, सातारा – 145, सोलापूर ग्रामीण – 26, औरंगाबाद ग्रामीण- 39, नांदेड – 155, परभणी – 75, हिंगोली – 21, नागपूर ग्रामीण – 132, भंडारा – 61, चंद्रपूर – 194, वर्धा – 90, गडचिरोली – 348, गोंदिया – 172, अमरावती ग्रामीण – 156, अकोला – 327, बुलढाणा – 51, यवतमाळ – 244
लोहमार्ग पुणे – 124, लोहमार्ग औरंगाबाद -154, एकूण – 14956
प्रवर्गनिहाय जागा अशा
अनुसूचित जाती – 1811, अनुसूचित जमाती – 1350, विमुक्त जाती (अ) – 426, भटक्या जमाती (ब) – 374, भटक्या जमाती (क) -473, भटक्या जमाती (ड) – 292, विमुक्त मागास प्रवर्ग – 292, इतर मागास वर्ग – 2926 इडब्लूएस – 1544, खुला – 5468 जागा, एकूण – 14956
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 3 नोव्हेंबर 2022
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट – www.mahapolice.gov.in
14956 पोलीस शिपाई जागा – Download PDF












































































