Last Updated on 11 Oct 2024 7:27 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ आतापर्यंत ज्या महिलांना मिळाला नाही, त्यांच्यापर्यंत लाभ पोहचवण्यासाठी ही मुदतवाढ देणात आली आहे. आता महाराष्ट्रातील महिलांना मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 ही नवीन मुदत दिली आहे. यापूर्वी या योजनेत अर्ज करण्याची मुदत सप्टेंबर अखेरपर्यंत होती. आता 15 ऑक्टोबर 2024 रात्री बारा वाजेपर्यंत या योजनेत अर्ज करता येणार आहे.
मात्र हे अर्ज फक्त अंगणवाडी सेविकांमार्फतच भरण्यात यावेत, अशी सूचना शासनाकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे, लाडक्या बहिणींना आता नव्याने अर्ज करण्याची संधी मिळाली आहे. पुढील 4 दिवसांत अर्ज करुन या योजनेचा लाभ घेता येईल. आजपर्यंत तब्बल 2 कोटी 30 लाख महिला या योजनेत पात्र ठरल्या असून त्यांच्या बँक खात्यावर पैसेही जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बहुतांश महिलांच्या बँक खात्यात तब्बल 5 हफ्ते म्हणजे 7500 रुपये जमा झाले आहेत. आता, उर्वरीत महिलांनाही लाडकी बहीण योजनेसाठी 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. मात्र, त्यासाठी केवळ अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून अर्ज करता येईल.
योजनेसाठी कोणती कागदपत्रे हवीत
✪ आधार कार्ड
✪ अधिवात/जन्म प्रमाणपत्र
✪ उत्पन्न प्रमाणपत्र
✪ अर्जदाराने हमीपत्र
✪ बँक पासबुक
✪ अर्जदाराचा फोटो
योजनेच्या लाभासाठी या आहेत अटी
✪ अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
✪ राज्यातील विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला अर्ज करु शकतील.
✪ आधी लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष होता. नवीन बदलानुसार तो 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आले आहे.
✪ लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
✪ लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.












































































