Last Updated on 28 Nov 2024 5:25 PM by Sanjay Patil/Adhorekhit
शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींच्या कार्यशाळेत गौरव
सांगली । इस्लामपूर येथील मुक्तांगण प्ले स्कूल अँड अँक्टिव्हिटी सेंटरला मुंबई येथे स्टार एज्युकेशन अवॉर्डने गौरविण्यात आले. संचालिका वर्षाराणी मोहिते व विनोद मोहिते यांनी पुरस्कार स्वीकारला.
मुंबई येथील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींची कार्यशाळा व शैक्षणिक प्रदर्शनात उद्योजक समीर शाहू , शिक्षकतज्ञ शंकर अय्यर, पिंकी भट, अक्षय भागवत , मुंबई विद्यापीठाचे प्रा. राधाकृष्णण यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला.
प्रत्यक्ष कृती आणि अनुभवातून शिक्षण देणारे इस्लामपूर ( ता वाळवा. जिल्हा सांगली) येथील मुक्तांगण प्ले स्कूल सहा वर्षांच्या आतील मुलांसाठी “खेळघर ” म्हणून नावारूपाला आले आहे. २०१० साला पासून इथं अनौपचारिक,सहज शिक्षण देत विविध “अनुभव” दिले जातात. गेली १४ वर्षे बालशिक्षणात ” मुक्तांगण ” राज्यात अव्वल आहे.
इस्लामपुरातील प्रशासकीय इमारतीच्या परिसरात मुक्तांगण प्ले स्कूल आहे.इथं प्ले ग्रुप,नर्सरी, एल केजी, युकेजी पर्यत वर्ग आहेत.बालशाळांचे अभ्यासक प्रा. विनोद व वर्षाराणी मोहिते यांच्या अथक परिश्रमातून “मुक्तांगण” चा ब्रँड राज्यात पथदर्शक बनला आहे.
शैक्षणिक गुणवत्ता, उपक्रमशीलता, पालकांचा प्रतिसाद, बालपण टिकवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न ,प्रत्यक्ष अनुभव , खेळातून दिले जाणारे शिक्षण आणि पालकत्वाचे प्रबोधन आदी बाबींसह भौतिक सुविधांच्या निरीक्षणावर मुक्तांगणचा स्टार एज्युकेशन अवॉर्डने सन्मान झाला.
मुक्तांगणला आयएसओ मानांकन मिळाले आहे. यापूर्वी नवी दिल्ली येथील प्राईम टाइम शैक्षणिक संशोधन संस्था, नवरभात समूहाने सर्वोत्कृष्ट प्ले स्कूलचा पुरस्कार देऊन “मुक्तांगणला” गौरविले आहे.
पर्यावरण संरक्षण व जागृतीसाठी ३१ हजार सीड बॉल निसर्गाच्या सानिध्यात टाकले आहेत. मुलांसह पालकांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात. राज्यातील अनेक मान्यवरांनी मुक्तांगणला भेट देत त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
मुक्तांगण प्ले स्कूलमध्ये नवंनव्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातोय. जागतिक पातळीवर असणाऱ्या ए आय चा वापर करून असणारे टॉकिंग ट्री लहान मुलांचे लक्ष वेधून घेत आहे.
बाल शिक्षणामध्ये गेली दोन दशके काम करणाऱ्या क्वॉलिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट ( क्वेस्ट ) संस्थेतर्फे ‘पहिली पायरी – बालवयातील वाचन, लेखन व गणित’ या कोर्स येथील मुक्तांगण स्कूलमध्ये पालकांसाठी घेतला जातोय.












































































