Last Updated on 25 Jan 2024 4:15 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर येथील मुक्तांगण प्ले स्कूलमध्ये राष्ट्रध्वजाबाबत माहिती देण्यात आली.प्लास्टिक राष्ट्रध्वज वापरू नका असा न्यायालयाचा अध्यादेश असल्याने लहान वयातच मुलांना याची जाणीव करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
इस्लामपूर येथील प्रशासकीय इमारतीच्या परिसरामध्ये मुक्तांगण प्ले स्कूल मध्ये खेळातून शिक्षण देण्यात येते.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी स्कूलच्या आवारात चिमुकल्या मुलांना राष्ट्रध्वजाची माहिती देण्यात आली.ध्वजाचे तीन रंग,अशोक चक्र याबाबत माहिती दिली गेली.राष्ट्रध्वज कसा हाताळावा? तीन रंगाचे महत्त्व समजावे याबाबत हा उपक्रम राबवण्यात आला.नागरिकांनी प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरू नये असे आवाहन यावेळी करण्यात आले.
संचालिका सौ.वर्षाराणी मोहिते म्हणाल्या,देशाचे राष्ट्रीय प्रतीक असणाऱ्या ध्वजाची माहिती असणे गरजेचे आहे. ध्वजारोहण कसे केले जाते.त्याचे महत्व,ध्वजाची हाताळणी कशी करावी याबाबत माहिती दिली. मुलांची निरीक्षण क्षमता जास्त असते.यामुळेच मुलांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला.











































































