Last Updated on 13 Dec 2023 9:23 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | मुंबई सीमाशुल्क विभागाच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने आज (13 डिसेंबर 2023) तळोजा येथे हेरॉईन,कोकेन, गांजा, चरस यासारखे अंमली आणि मनावर परिणाम करणारे नशा आणणारे 54.850 किलो पदार्थ (एनडीपीएस) नष्ट केले.अंमली पदार्थ नष्ट करण्याची मोहीम मुंबई सीमाशुल्क विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या मुंबई सीमाशुल्क क्षेत्र -I, सीबीआयसीच्या उच्चस्तरीय अंमली पदार्थ नष्ट समितीसमोर राबवण्यात आली.महाराष्ट्रात नवी मुंबईतील तळोजा येथील घातक कचरा प्रक्रिया साठवण आणि विल्हेवाट सुविधा (सीएचडब्लूटीएसडीएफ),एमडब्ल्यूएमएल येथे हे अंमली पदार्थ जाळून नष्ट करण्यात आले. नष्ट करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची अवैध बाजारपेठेतील किंमत सुमारे 410 कोटी रुपये आहे.
या वर्षभरात अंमली पदार्थ नष्ट करण्याची ही तिसरी वेळ आहे. पहिल्यांदा 02.03.2023 रोजी अंदाजे 240 कोटी रुपये किंमतीचे 61.585 किलो आणि 19.07.2023 रोजी दुसऱ्यांदा अवैध बाजारात 865 कोटी रुपये किंमतेचे 128.47 किलो अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. अशा प्रकारे, या वर्षात 1515 कोटी रुपये किंमतीचे एकूण 244.905 किलो अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले.
विशेष तपास आणि गुप्तचर शाखा (एसआयआयबी) आणि महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) यांसारख्या विविध संस्थांनी हे अंमली पदार्थ जप्त केले आहेत.









































































