Last Updated on 22 Jul 2023 10:07 AM by Sanjay Patil/Adhorekhit
अमोल मिटकरी यांच्या ट्वीट ने पुन्हा एकदा चर्चाना उधाण
मुंबई ।
‘मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच #अजितपर्व’ असे कॅप्शन दिलेले ट्वीट व्हायरल होत आहे.आमदार अमोल मिटकरी यांच्या या ट्वीट ने राज्यात खळबळ उडाली आहे
राज्याच्या राजकारणात कधी काय होईल याचा नेम राहिला नाही.राज्यात गेल्या तीन वर्षात जनतेला राजकारणातील अनेक स्थित्यंतरे पाहावयास मिळाली.2019 च्या निवडणुकीत युतीच्या बाजूने कौल मिळाला.पण,शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली.त्यावेळी महाविकास आघाडी उदयास आली.पुढे झालेला राजकारणाचा झालेला खेळखंडोबा राज्यातील जनतेला बघायला मिळाला.उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.एकनाथ शिंदे यांनी भाजपसह हातमिळवणी केली.सत्तेत विराजमान होत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
हेही वाचा – तलाठी भरतीला पुन्हा मुदतवाढ; 25 जुलै रात्री 11.55 पर्यंत करता येणार अर्ज
त्यानंतर एक महिन्यापूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड करत युती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.आणि अवघ्या दिढ तासात उपमुख्यामंत्री पदाची शपथ घेतली.अजित पवार यांचा आज,शनिवारी 22 जुलै रोजी वाढदिवस आहे.त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्वीट केले आहे.ते ट्वीट जोरदार व्हायरल होत आहे.
ते ट्वीट असं
‘मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच #अजितपर्व’ अशा कॅप्शनसह आमदार अमोल मिटकरी यांनी एक अजित पवार यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे.
मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच #अजितपर्व pic.twitter.com/12jZ8BMPRi
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 21, 2023
वाढदिवस साजरा न करण्याचे अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन
दरम्यान,रायगडच्या खालापूरमधील इर्शाळवाडीत घरांवर दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे.यामध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला असून अद्याप अनेकजण बेपत्ता आहेत.यासह दुर्घटनेत मोठी वित्तहानीही झाली आहे.या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली.अजित पवार यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना तसेच हितचिंतकांना आवाहन केले आहे की,’कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नका. पुष्पगुच्छ,होर्डींग,जाहिरातींवर पैसे खर्च न करता तो निधी इर्शाळवाडी गावाच्या पूर्नउभारणी आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणावा.’









































































