Last Updated on 19 Aug 2025 10:13 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । सांगली जिल्ह्यात होत असलेला पाऊस तसेच कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाच्या ठिकाणी पाणी पातळीत होणारी वाढ, कोयना व वारणा धरणांचा विसर्ग इत्यादी सर्व बाबी लक्षात घेता, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार सांगली जिल्ह्यातील मिरज, वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यामधील तसेच मनपा क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय शाळांना दि. 20 व 21 ऑगस्ट या दोन दिवस सुट्टीचे आदेश निर्गमित केले आहेत.
संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता नागरिकांना स्थलांतर झाल्यानंतर राहण्यासाठी शाळांची जागा, शाळा खोल्या उपलब्ध करून देण्याकामी जिल्हाधिकारी सांगली तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अशोक काकडे यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन परिपत्रक दिनांक 2 ऑगस्ट 2019 अन्वये हे आदेश निर्गमित केले आहेत.
तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावयाचे असल्याचे आदेशात म्हटले आहे.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 31 Jul 2026 12:29 AM by Sanjay Patil/Adhorekhit सांगली जिल्ह्यात १२ हजार ३८५ शेतकऱ्यांकडे अद्याप ‘फार्मर आयडी’ नाही ‘अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती’साठी ३८ हजार शेतक... Read more









































































