Last Updated on 30 Sep 2021 5:15 PM by Sanjay Patil/Adhorekhit
असे असेल या महिन्याचे राशी भविष्य
![]()
मेष
आर्थिक लाभ होतील
रवि-मंगल-बुध युती षष्ठात.गुरु-शनि कर्मस्थानी,राहु धनात.शुक्र केतु अष्टमात.शत्रूचिंता मिटेल.आर्थिक लाभ होतील.सुवर्णालंकार खरेदीचे योग येतील.सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल.मात्र कौटुंबिक कलह संभवतात.त्यादृष्टीने काळजी घ्यावी.नोकरदारांना नविन संधी उपलब्ध होतील.
![]()
वृषभ
विवाह जुळून येतील
रवि,मंगल,बुध युती पंचमस्थानी.गुरु-शनि भाग्यात.राहु प्रथमस्थानी.शुक्र-केतु सप्तमात.नोकरी व उद्योगधंद्यात शत्रु कार्यामुळे अडचणी निर्माण होतील,कर्माला भाग्याची साथ लाभल्याने यातूनही मार्ग निघेल.कामानिमित्त दूरचे प्रयास घडतील.विवाहइच्छुकांचे विवाह जुळून येतील.होतकरूंना त्यांच्या कामाचे चीज झाल्याचे समाधान प्राप्त होईल.
![]()
मिथुन
मानसिक व आर्थिक चिंता भेडसावतील
रवि,मंगल,बुध चतुर्भात.गुरु,शनि अष्टमात.शुक्र-केतू षष्ठात.राहू व्ययात.आपल्यासाठी काहीसे अडचणीचे ग्रहमान असल्यामुळे आहे तिथेच स्थिर राहणे हितावह ठरेल.शत्रुत्व व कुसंगतीमुळे अडचणीत याल.आर्थिक व्यवहारात फसगत होण्याचे योग संभवतात,त्यादृष्टीने सावध पावले टाकावीत.मानसिक, आर्थिक चिंता भेडसावतील.
![]()
कर्क
श्रमाचा योग्य मोबदला मिळेल
रवि,मंगळ, बुध तृतीयात.गुरु,शनी सप्तमात. शुक्र, केतु पंचमात, राहु लाभात.पूर्वी झालेले नुकसान भरून निघण्याच्या दृष्टीने आपल्यासाठी अनुकूल कालावधी आहे.मोठ्या आर्थिक उलाढालीतून फायदा होईल. नोकरी व विवाहइच्छुकांसाठी चांगला काळ आहे.उद्योग व्यवसायात गती वाढण्यास मदत होईल.केलेल्या श्रमाचा योग्य मोबदला प्राप्त होईल.
![]()
सिंह
भाऊबंधकीचा त्रास जाणवेल
रवि,मंगळ बुध द्वितीयात,गुरु-शनि षष्ठात,शुक्र,केतु चतुर्थात,राहू दशमात.आपल्यासाठी संमिश्र ग्रहमान आहे.सार्वजनिक जीवनात गैसमजामुळे मानहानीचे प्रसंग उद्भवतील.भावबंधकीचा त्रास जाणवेल.मानसिक व अपघाताच्या प्रसंगातून आरोग्य बिघडण्याचा धोका संभवतो, त्यादृष्टीने काळजी घ्यावी.
![]()
कन्या
अनेक कामे मार्गी लागतील
रवि,मंगल,बुध प्रथमात.गुरु-शनि पंचमात.शुक्र,केतु तृतियात.राहू भाग्यात.प्रत्येक बाबतीत आपल्या कार्यकर्तृत्वाच्या प्रभावामुळे अनेक कामे मार्गी लागतील,आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होईल.स्पर्धकही आपल्या कामाचे कौतुक करतील.शैक्षणिक बाबतीत अनुकूल काळ आहे.स्पष्टवक्तेपणामुळे शत्रूनिर्माण होतील त्यादृष्टीने काळजी घ्यावी.
![]()
तूळ
वाद-विवाद टाळावेत
रवि,मंगळ,बुध व्ययात.गुरु शनि चतुर्थात,शुक्र,केतू धन स्थानात,राहु अष्टमात.आपल्यासाठी पावलोपावली शत्रूंनी काटे पेरून ठेवले आहेत असे काहीसे अडचणीचे ग्रहमान अनुभवास येईल.त्यादृष्टीने वाद-विवाद टाळून,रागावरती नियंत्रण ठेवून वाटचाल करणे हितावह ठरेल.हेही दिवस जातील या युक्तीप्रमाणे आज सोसलेल्या मानहानीकारक प्रसंगातून पुढे चांगले काहीतरी घडेल असा चमत्कारिक अनुभव येईल.उत्तरार्धात थोडासा दिलासा मिळेल व यशाची चाहूल लागेल.
![]()
वृश्चिक
उदयोग व्यवसायात वाढ होईल
रवि,मंगल,बुध लाभात,गुरु शनि तृतीयात,शुक्र-केतु प्रथमात,राहु सप्तमात.उदयोग व्यवसायात वाढ होण्याच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे.पुत्र-पौत्रांचे भाग्योदय होतील.घरात मंगलकार्य घडणार असल्याची चाहूल लागेल.उत्साह वाढल्यामुळे नवनवीन कल्पना सुचतील,त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी योग्य नियोजन कराल.अर्थकारण सुधारण्यास मदत होईल.
![]()
धनु
कामानिमित्त प्रवास घडतील
रवि,मंगल,बुध दशमात.गुरू-शुक्र द्वितियात शुक्र-केतु व्ययात,राहू षष्ठात.नोकरीतबदल संभवतो.विवाहासाठीही अनुकूल काळ आहे.सर्वच बाबतीत पूर्वार्ध आनंददायी घटनांचा साक्षीदार ठरणारा आहे.कामानिमित्त प्रवास घडतील.उद्योग व्यवसायात गतीमानता प्राप्त होईल.कौतुकाचे सोहळे अनुभवास येतील.
![]()
मकर
अनपेक्षित घटनांमुळे दगदग
रवि,मंगळ,बुध भाग्यात,गुरू,शनि प्रथमात.शुक्र केतु लाभात,राहु पंचमात.आपल्यासाठी संमिश्र ग्रहमान आहे.पूर्वार्धात नोकरी व्यवसायात अपेक्षित यशप्राप्ती होईल, मात्र उत्तरार्धात अडचणींच्या प्रसंगाचा सामना करावा लागेल.जोडीदाराच्या विचित्र वागण्यामुळे त्रास संभवतो.त्यादृष्टीने काळजी घ्यावी अनपेक्षित घटनामुळे दगदग होईल.
![]()
कुंभ
आर्थिक कोंडी होईल
रवि,मंगल,बुध अष्टमात. गुरु,शनि व्ययात,शुक्र,केतु दशमान,राहु चतुर्थात.एकाचवेळी चारी बाजुने संकटे आली असल्याचा भास होईल,मात्र स्थिर बुद्धी व मन शांत ठेवून वाटचाल केल्यास सर्वच बाबतीत दिलासा मिळेल.आर्थिककोंडी,नोकरीतील त्रास या चिंता जास्त प्रमाणात भेडसावतील.आहे तिथे स्थिर राहून हेही दिवस जातील अशी आशा बाळगून काम करा. मार्ग निघेल.
![]()
मीन
आर्थिक प्राप्ती चांगली होईल
रवि,मंगळ,बुध सप्तमात.गुरु,शनी लामात.शुक्र,केतु भाग्यात राहु तृतीयात.आपल्या यशप्राप्तीसाठी चारी दिशा खुल्या राहतील.सहजरित्या कामे मार्गी लागतील.उदयोगधंदा,नोकरी या सर्वच बाबतीत यशप्राप्तीचे योग आहेत.विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील.आर्थिक प्राप्ती चांगली होईल.भावनिक वादात न अडकता पुढे गेलात तर आपल्यासाठी अनुकूल काळ आहे.
![]()
अधिक बडवे
ज्योतिष प्रविण,ज्योतिष प्राज्ज्ञ
भ्रमणध्वनी : 9850818193














































































