Last Updated on 24 Mar 2022 11:09 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांची माहिती । लोकनेते राजारामबापू पाटील नाट्यगृहात व्याख्यानमाला
सांगली ।
इस्लामपूर येथील माणुसकीचं नातं प्रतिष्ठानच्यावतीने शनिवार दि. २६ मार्च ते सोमवार दि. २८ मार्च या कालावधीत इस्लामपूर येथे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे मार्गदर्शक, पोलिस उपअधिक्षक कृष्णात पिंगळे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
या व्याख्यानमालेचे उद्घाटन राज्याचे जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील यांच्या हस्ते होणार असल्याचे त्यांनी सांगितले. येथील राजारामबापू नाट्यगृहामध्ये शनिवारपासून सायंकाळी ६ वाजता व्याख्यानमाला होणार आहे. शनिवार दि. २६ मार्च रोजी चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांचे उठावा महाराष्ट्र देशफ या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
रविवार दि. २७ मार्च रोजी भारतीय बनावटीचे पहिले विमान बनविणारे कॅप्टन अमोल यादव यांचे व्याख्यान होणार असून माजी ग्रामविकासमंत्री अण्णासाहेब डांगे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. ङ्गमेक इन इंडियाफहा कॅप्टन अमोल यादव यांचा व्याख्यान विषय आहे.
सोमवार दि. २८ मार्च रोजी ज्येष्ठ पत्रकार, संपादक, विचारवंत मधुकर भावे यांचे ङ्गमहाराष्ट्र काल, आज आणि उद्याफया विषयावर व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थान ज्येष्ठ विचारवंत सेवानिवृत्त प्राचार्य विश्वास सायनाकर हे भूषविणार आहेत. तर यावेळी महाराष्ट्र साहित्य कलाप्रसारिणी पुणेचे कार्याध्यक्ष सचिन इटकर यांची प्रमुख उपस्थिती आहे, असे पोलिस उपअधिक्षक पिंगळे यांनी सांगितले. या पत्रकार बैठकीस माणुसकीचं नातं प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. अशोक शिंदे, उपाध्यक्ष उमेश कुरळपकर, सचिव प्रा. महेश जोशी, खजिनदार गौतम रायगांधी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.












































































