Last Updated on 28 Apr 2023 7:26 PM by Sanjay Patil/Adhorekhit
दुस-या गुन्हयात बेलीफास धमकावल्याप्रकरणी आरोपीस १० दिवसांच्या शिक्षेसह २ हजाराचा दंड
सिंधुदुर्ग | नागवे गावात तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या तत्कालीन तलाठी शालिनी नारायण येडगे (रा. कणकवली) या तलाठी कार्यालयात शासकीय कर्तव्य बजावत असताना आरोपी नंदकिशोर भिवा सुतार (वय ५७ वर्षे ) यांने हातात कोयता घेऊन त्यांच्या अंगावर धावून गेला. जमिनीच्या सातबारासाठी आपणांस सारख्या फे-या मारावयास लावता असे ओरडत त्यांच्या मानेवर कोयता ठेवून ठार मारण्याची धमकी दिली होती.या प्रकरणी नंदकिशोर सुतार याला जिल्हा न्यायाधीश श्रीमती जोशी यांनी दोषी धरुन २७ दिवसांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. गजानन तोडकरी व तपासिक अधिकारी म्हणून एपीआय सागर खंडागळे यांनी काम पाहिले ही घटना २९ ऑक्टोबर २०२० रोजी नागवे तलाठी कार्यालयात घडली होती.या प्रकरणी नंदकिशोर सुतार याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली होती.या खटल्याची सुनावणी होऊन जिल्हा न्यायालयाने नंदकिशोर सुतार याला बुधवारी शिक्षा सुनावली.
त्याच प्रमाणे दुस-या केस मध्ये फिर्यादी सुनील महादेव ठाकुर (रा कणकवली) हे कणकवली न्यायालयात बेलीफ म्हणून काम पाहतात. दिनांक 6 जून 2019 रोजी आरोपी संतोष नारायण राणे रा. कणकवली यांना वॉरंट बजावणीकामी गेले असता,आरोपी संतोष नारायण राणे यांनी फिर्यादी (बेलीफ) श्री. ठाकुर यांना शिवीगाळ करून हातपाय तोडून टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणी आरोपी संतोष नारायण राणे याला जिल्हा न्यायाधीश श्रीमती जोशी यांनी दोषी धरुन १० दिवसांची भोगलेली शिक्षा कायम करुन २००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. गजानन तोडकरी व तपासिक अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक बापू पांडूरंग खरात यांनी काम पाहिले ही घटना ०६ जून २०१९ रोजी घडली होती. या प्रकरणी आरोपी संतोष नारायण राणे याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली होती,या खटल्याची सुनावणी होऊन न्यायालयाने आरोपी संतोष नारायण राणे याला बुधवारी शिक्षा सुनावली.
दोन्हीही गुन्हयात अॅड. गजानन तोडकरी, जिल्हा न्यायालयातील कोर्ट पैरवी जयराम पाटील पोलीस उपनिरीक्षक, कणकवली येथील कोर्ट पैरवी नितिन बनसोडे यांनी दोषसिध्दीकामी चांगली कामगिरी केली आहे.
महाराष्ट्र शासनामार्फत दोषसिध्दीचे प्रमाण वाढविण्याकरिता महाराष्ट्र पोलीस दलाने (Trial Monitoring Cell) ची स्थापना ची पत्येक जिल्हयामध्ये निर्मिती केली होती. जिल्हयात पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी Trial Monitoring Cell ची स्थापना करुन त्याव्दारे जिल्हयामध्ये विविध न्यायालयांमध्ये सुरु असलेल्या खटल्याचे कामकाजावर देखरेख करुन दोषसिध्दीचे प्रमाण वाढविण्याकरिता स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखालील सहा. पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, पोलीस हेडकॉन्स्टेबल काळसेकर, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल खानोलकर यांची नियुक्ती केलेली होती. सदर T.M.C. सेल मार्फत पोलीस ठाणे स्तरावर कोर्ट पैरवी यांच्याशी समन्वय साधून दैनंदिन कामकाज पहात असतात. त्यामुळे गुन्ह्याच्या दोष सिध्दीच्या प्रमाणामध्ये हळूहळू वाढ होऊन गुन्हेगारांना शासन होत असल्याचे दिसत आहे. T.M.C. सेलचे कामकाजावर अपर पोलीस अधीक्षक नितिन बगाटे वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहेत. जिल्हा न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यांमध्ये आरोपींना शासन व्हावे याकरिता पोलीस अधीक्षक श्री. अग्रवाल हे प्रयत्नशील आहेत.












































































