Last Updated on 15 Oct 2024 9:53 AM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगूल आज वाजणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी ३.३० वाजता पत्रकार परिषद घेऊन राज्यातील आणि झारखंड येथील विधानसभा निवडणुकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे. या बाबत निवडणूक आयोगाने पत्रक काढले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या वेळी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड मध्ये विधानसभा निवडणूकांच्या तारखा आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्रात 288 जागांवर विधानसभेची निवडणूक होणार आहे. तर सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 27 नोव्हेंबरला संपत असल्याने आता निवडणूकांच्या तारखेकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.








































































